बालवाडीत भरली विठ्ठल नामाची शाळा

खारघर रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सनराईज-आदर्श सेवाभावी सामा. संस्थेच्या वतीने विठुनामाचा जयघोष
 
खारघर :   रविवार ता. दहा रोजी  साजरी होत असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी, भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. विठुराया अन् आषाढीचे महत्त्व  बालवाडीतील  चिमुकल्यांनाही समजावे, या उद्देशाने शनिवारी इंदिरानगर येथील बालवाडीत आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.  यावेळी  चिमुकल्यांनी विठुनामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
 
   खारघर रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सनराईज आणि आदर्श सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने खारघर आणि नवी मुंबईतील नेरुळ आणि तुर्भे झोपडपट्टीत बालवाडी सुरु आहेत. यावेळी इंदिरानगर येथील बालवाडीत  विठ्ठल-रखूमाई, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हाती टाळ घेत चंद्रभागेच्या तिरी, पाऊले चालती, विठ्ठलनामाची शाळा भरली... यांसारखी गीते व भजने विद्यार्थ्यांनी सादर केली. शिक्षिका सुरेखा कांबळे  यांनी विठ्ठल रुख्मिणीच्या प्रतिमेची पूजन करून चिमुकल्या सोबत  विठ्ठलाची आरती घेवून  आषाढी एकादशीची माहिती दिली. या उपक्रमाचे  खारघर रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सनराईजचे पदाधिकारी दिलीप चौधरी यांनी कौतुक करीत इतरही बालवाडीत विविध उपक्रम राबवावे असे सांगितले. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सानपाडा रेल्वे स्थानकात पूर्वेकडे तिकीट खिडकी सुरु करण्यासाठी सुनिल कुरकुटे यांचे रेल्वे स्टेशन प्रबंधकांना पत्र