एफ.जी.नाईक. महाविद्यालयात  जागर विठू माऊलीचा

आषाढी एकादशी निमित्त  संत परंपरेचा जागर

कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण मंडळाचे एफ.जी. नाईक महाविद्यालयात मराठी वाड:मय मंडळाचे उद्घाटन व आषाढी एकादशीचे  औचित्य साधून "जागर विठू माऊलीचा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

       सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी सिताराम म्हात्रे फाउंडेशनचे संस्थापक आणि One Hundred Poems Of Tukaram , One Hundred Poems of Chokha Mela या पुस्तकांचे लेखक  चंद्रकांत म्हात्रे यांच्या हस्ते झाले. सदर प्रसंगी रा. फ. नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक  सुधीर थळे, रा.फ.नाईक विद्यालयाचे  उपमुख्याध्यापक नरेंद्र म्हात्रे, एफ.जी.नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रताप महाडिक , मराठी वाड:मय मंडळ प्रमुख प्रा. सीमा शिंदे व सदस्य प्रा. स्मृतिगंधा बिडकर प्रा. समिधा पाटील प्रा. स्वाती हेलकर सर्व शिक्षक व शिक्षर्केतर कर्मचारी उपस्थित होते.

    प्रास्ताविक पर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक सर यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राला लाभलेली थोर संतांची परंपरा व संत साहित्याची विपुल माहिती सांगितली तसेच लाखो भाविक भक्तिभावाने विठ्ठल नामाचा गजर करत या वारीतून एकात्मता सर्वधर्मसमभाव, स्त्री-पुरुष समानता, नैतिकता या मूल्यांची कशी शिकवण देतात याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

 या मूल्यातून विद्यार्थ्यांनी आपला व्यक्तिमत्व विकास कसा साध्य केला पाहिजे हे विद्यार्थ्यांना सांगितले व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या‌

        सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  चंद्रकांत म्हात्रे   यांनी महाराष्ट्राच्या थोर संत परंपरेचा इतिहास, संतांची महती त्यांचे विचार व मराठी साहित्यातील संतांचे योगदान याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला . तसेच विविध संतांच्या अभंगातील ओव्यांचे दाखले देत संतांची शिकवण जसे की बंधुभाव , सर्वधर्मसमभाव, स्त्री- पुरुष समानता, सामाजिक बांधिलकी व आजच्या समाजात एक सृजान आणि सज्जन नागरिक कसे व्हावे हे सांगून सर्व विद्यार्थ्यांना या संतपरंपरा जतन करण्याचे आवाहन केले . तसेच आजच्या तरुण पिढीने अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होवून समाजाला योग्य दिशा देऊन आपले नेतृत्व सिद्ध करणे कसे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन  विद्यार्थ्यांना केले. व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

         सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त भाग घेत अभंग गायन , भावगीते , भक्ती गीते गायन, वाद्य वादन, आषाढी एकादशीचे महत्त्व अशा विविध कलात्मक अविष्कारातून संतांचे विचार प्रकट केले  तसेच दिंडीच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव, सहकार्य, समानता, बंधुता या मूल्यांचे महत्त्व सांगितले व त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन ,  साक्षरता, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती  यांसारख्या संदेशांद्वारे  जनजागृती केली. व संपूर्ण कार्यक्रम उत्साहात साजरा केला.

      सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी वाड:मय मंडळ प्रमुख प्रा. सीमा शिंदे  विद्यार्थी प्रतिनिधी, दीप्ती सावंत, इशा भोसले, तन्वी मोरे, प्रतीक्षा बुट्ट यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मराठी वाड:मय मंडळ सदस्य प्रा. स्मृतिगंधा बिडकर यांनी मानले.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बालवाडीत भरली विठ्ठल नामाची शाळा