रबाळे एमआयडीसीतील कंपनीत घुसलेल्या अजगराची सुटका    

अजगराला सुखरुप जंगलात सोडले 

नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीतील एका कंपनीच्या कार्यालयात घुसलेल्या 5 फूट लांब अजगराला अम्मा केअर फाऊंडेशन आणि फ्लांट अँन्ड अनिमल्स वेल्फेयर सोसायटीचा स्वयंसेवक भूषण साळवे यांनी सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर या स्वयंसेवकने सदर सापाला सुखरुप जंगलात सोडले.  

रबाळे एमआयडीसीतील ज्योती प्रोसेस इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयात शुक्रवारी सकाळी एक साप घुसला होता. याबाबतची माहिती ज्योती शिंदे यांच्याकडून मिळाल्यानंतर अम्मा केअर फाऊंडेशन आणि फ्लांट अँन्ड अनिमल्स वेल्फेयर सोसायटीचा स्वयंसेवक भूषण साळवे यांनी सदर कंपनीत धाव घेतली. त्यानंतर भुषण साळवे यांनी 5 फुट लांब असलेल्या बिनविषारी अजगराला सुखरुप बाहेर काढले. त्यांनतर त्यांनी सदर सापाची माहिती ठाणे येथील वनविभागाला दिल्यानंतर सदर सापाची पशुवैद्यक डॉ.राहुल मेश्राम यांच्याकडुन तपासणी करण्यात आली. त्यानंतर सदर सापाला जंगलात सोडून देण्यात आल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक आणि एसीएफ आणि पीएडब्ल्यूएस मुंबईचे संस्थापक सुनीश सुब्रमण्यन यांनी दिली. जर कुणाला वन्यप्राणी संकटात असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी एसीएफ आणि पीएडब्ल्यूएस या संस्थेच्या 9833 480388 या हेल्पलाइन संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.   

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

संततधार पर्जन्यवृष्टीने मोरबे धऱणाच्या पातळीत वाढ