विनापरवानगी जाहिराती, होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स बाबत तक्रारीसाठी टोल फ्री नंबर उपलब्ध

 नवी मुंबई : अनधिकृत बॅनर्स / पोस्टर्स तसेच होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे निर्देश मा.उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. 155/2011 याबाबत दिले असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विनापरवानगी बॅनर्स / पोस्टर्स तसेच होर्डिंग्ज लावून व भिंती रंगवून जाहिराती करु नयेत, तसेच झाडावर कोणत्याही जाहिराती लावून त्यांना इजा पोहचवू नये असे सर्व नागरिक / संस्था / मंडळे यांना सूचित करण्यात येत आहे. याचे उल्लंघन करणा-या संबधितांवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदयांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावयाची आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये विनापरवानगी जाहिराती / होर्डिंग्ज / बॅनर्स / पोस्टर्स आढळल्यास त्याची माहिती नागरिकांनी महापालिकेस देण्यासाठी पुढील प्रमाणे टोल फ्री नंबर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

तरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सूज्ञ व जागरुक नागरिक यांना विनापरवानगी जाहिराती / होर्डिंग्ज / बॅनर्स / पोस्टर्स आढळल्यास त्याची माहिती व छायाचित्रे 8422955912 या मोबाईल क्रमांकावर  WhatsApp व्दारे पाठवावीत असे आवाहन आहे. शहर स्वच्छतेमध्ये नागरिकांचे नेहमीच सक्रीय योगदान राहिले आहे ते शहर विद्रुपीकरणाला प्रतिबंध करणा-या या कामीही लाभावे असे आवाहन आहे.  

विभाग कार्यालयचे नाव

नोडल ऑफिसर तथा विभाग अधिकारी

टोल फ्री क्रमांक

बेलापूर

मिताली संचेती

1800 222 312

नेरुळ

विनोद नगराळे

1800 222 313

वाशी

सुखदेव येडवे

1800 222 315

तुर्भे

सुबोध ठाणेकर

1800 222 314

कोपरखैरणे

प्रशांत गावडे

1800 222 316

घणसोली

शंकर खाडे

1800 222 317

ऐरोली

महेंद्र सप्रे

1800 222 318

दिघा

मनोहर गांगुर्डे

1800 222 319

मुख्यालय

---

1800 222 309

1800 222 310

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासह इतर मागण्या सोडविण्याची मागणी