वाशी पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे सुमारास एका सापाचा प्रवेश

नवी मुंबई : शुक्रवारी रात्री दिड वाजण्याच्या सुमारास एका सापाने वाशी पोलीस ठाण्यात प्रवेश केल्याने पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची एकच तारांबळ उडाली.  सुदैवाने पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ठाणे अंमलदारांना हा साप निदर्शनास आल्याने त्यांनी सर्प मित्राच्या मदतीने या सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.  

वाशी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या गार्डनमधून वाट चुकलेले एक सापाचे पिल्लु शुक्रवारी पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास वाशी पोलीस ठाण्यात घुसले. हा साप पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षाजवळ आला असता, कर्तव्यार असलेल्या ठाणे अंमलदारांचे लक्ष या सापावर गेले. त्यानंतर पोलिसांची एकच तारांबळ उडाली. यावेळी पोलिसांमध्ये असलेल्या सर्प मित्राने या सापाला पकडुन सुरक्षित ठिकाणी सोडले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.   

मात्र, मागील तीन दिवसांपासुन वाशी पोलीस ठाण्याच्या आवारात सापांचे दर्शन होत आहे. शुक्रवारी तर एका छोटया सापाने चक्क पोलीस ठाण्यातच प्रवेश केला. वाशी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या गार्डमधुन सदरचे साप वाट चुकून पोलीस ठाण्यात घुसले असावे अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दोन ते अडीच फुटाचे असलेला हा साप विषारी असल्याचे बोलले जात आहे. हा साप जर कुणाला निदर्शनास आला नसता, तसेच तो एखाद्या कोपऱयात लपुन बसला असता, तर अनर्थ घडला असता, अशी प्रतिक्रीया पोलिसांमधुन व्यक्त होत आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विनापरवानगी जाहिराती, होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स बाबत तक्रारीसाठी टोल फ्री नंबर उपलब्ध