स्व. वैभव गजानन म्हात्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक कार्यक्रम

पनवेल : कोरोनाचा काळ आटोक्यात आल्यानंतर जून महिन्यामध्ये पनवेल, उरण मधील शाळा नियमितपणे सुरू झाल्या. गेल्या दोन वर्षातील काळ पाहता बऱ्याच पालकांची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. अशा परिस्थितीत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम घेत असतात. याच सामाजिक बांधिलकीतून स्वर्गीय वैभव गजानन म्हात्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून आज उरणमधील जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मोरा या ठिकाणी वह्या चे  वाटप करण्यात आलं.

         याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की पनवेल आणि उरण परिसरात जे.एम.म्हात्रे साहेबांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून प.म.पा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे अध्यक्ष असलेल्या त्यांच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सतत सुरू असतात. त्यामध्ये शिक्षण विभागात गरजू गरीब विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप असो, मोफत शालेय पुस्तके असो, निराधार विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मोफत शिक्षण देणे असो, आणि आज शाळेमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम तसेच आदिवासी पाड्यांमध्ये आवश्यक ते धान्य वाटप असो यामधून नेहमीच समाजाबद्दलची आपुलकीची बांधिलकी पनवेल-उरण करांनी बघितली आहे. याप्रसंगी संस्थेचे सचिव जे.के.मढवी, हायस्कूल चेअरमन .परशुराम कोळी ,इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन दिलीप मुंबईकर, प्राचार्य श्री.सुधीर मुंबईकर, प्रभारी प्राचार्य श्री.गावंड सर  व सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

११ जुलै पर्यत मागण्या मान्य न झाल्यास १२ जुलैला शेतकऱ्यांचा गेट बंद आंदोलनाचा इशारा