वास्तुविहार सोसायटी मधील राहिवासीयांचा  प्रश्नांवर सिडको कार्यालयात धडक

खारघर : खारघर सेक्टर सोळा मधील वास्तूविहार सोसायटीत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचा निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खारघर मधील सिडको कार्यालयात धडक देवून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यावेळी  शिवसेना उपशहर प्रमुख नंदु वारुंगसे, सचिन वारुळे, विनोद गाडे,शंकर कर्णे, मोहन शेंडगे, ज्ञानेश्वर,दत्तात्रय म्हात्रे , शाम देशमुख , छाया कदम, हेमलता अहिरे, तसेच सोसायटीतील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

खारघर सेक्टर 16 मधील  वास्तुविहार सोसायटीत सहाशेहून अधिक सदनिका आहे. परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. सिडकोकडून पूर्वीपेक्षा सिडको वसाहतीत 30 एमएलडी अधिक पाणी पुरवठा वाढ झाल्याचे सिडकोकडून सांगितले जाते, मात्र खारघर मधील वास्तुविहार सोसायटीत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे रहिवासीयांना पाणी विकत घेवून प्यावे लागत असल्यामुळे शुक्रवार दुपारी बारा वाजता शिवसेनेचे पदाधिकारी आणि रहिवासीयांनी सिडको अधिकाऱ्यांना कमी पाणी पुरवठा होत असल्याचे जाब विचारून खारघर मध्ये समप्रमाणात पाणी पुरवठा करण्यात यावे अशी मागणी करून वास्तुविहार सोसायटी मधील पाणी समस्या सोडविण्यात यावे असे निवेदन दिले.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्व. वैभव गजानन म्हात्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक कार्यक्रम