एक वर्षापासून बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम ठप्प

नवी मुंबई : नवी मुंबईतील  ऐतिहासिक अशा बेलापूर किल्ल्याचे सिडको मार्फत  संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले होते.मात्र सदर काम पुरातत्व खात्याच्या नियमांना धरून नसल्याचा आरोप होत असताना १२ जून २०२१ रोजी बेलापूर किल्ल्याचा बुरुज ढासळला होता.या घटनेला तब्बल एक वर्षाचा कालावधी उलटला तरी देखील या किल्ल्याचे काम अजुनही ठप्प असल्याने नवी मुंबईतील इतिहास प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

सिडको मार्फत  अडीच तीन  वर्षापूर्वी नवी मुंबईतील बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले होते.१८ कोटी खर्च असलेले हे काम करण्यासाठी सिडकोने किमया कन्सलटंट यांना नेमले होते.

मात्र संवर्धनाचे काम हे समाधानकारक होत नसल्याने  व राज्य पुरातत्व विभाग यांनी कामाची पाहणी केल्यानंतर  पुरातन व संवर्धनाचे नियम डावलून बेलापूर किल्ल्याचे केलेले सिमेंटीकरणाचे काम केलं होते.या विरोधात  नवी मुंबई निकज  राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष नितीन नाना चव्हाण यांनी सिडको शहर अभियंता यांना घेराव घालत आणि जाब विचारला होता.

तसेच नितीन चव्हाण यांनी यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख व आमदार शशिकांत शिंदे यांकडे सदर कामाची तक्रार केली होती. यावर पुरातत्व खात्याचे अधिकारी व सिडको अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना सांस्कृतिक मंत्र्यांनी दिले होते आणि या पाहणी दरम्यान किल्याच्या कामात सिमेंट चा वापर झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर सदर काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र १२ जून २०२१ रोजी झालेल्या पावसात सदर किल्ल्याचा बुरुज ढासळला आणि या घटनेला एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र तरी देखील या किल्ल्याच्या कामात कुठलाच विकास झाला नसल्याने नवी मुंबईतील इतिहास प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वास्तुविहार सोसायटी मधील राहिवासीयांचा  प्रश्नांवर सिडको कार्यालयात धडक