एपीएमसी फळ बाजारात देशी रामबुतान  फळे दाखल

नवी मुंबई -: वाशीतील एपीएमसी  फळ बाजारात एरव्ही परदेशातुन  रामबुतान फळ आयात केले जातात. मात्र आता  यंदा देशी जन्मू-काश्मीर येथील रामबुतान फळ बाजारात दाखल झाले आहेत. लीची सारखे दिसणारे मात्र चवीला अधिक गोड हे रामबुतान फळ आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर ठरत असल्याने मागणीत वाढ होत आहे . त्यामुळे आता परदेशी व्यतिरिक्त भारतात ही याचे उत्पादन घेतले जात असल्याची माहिती फळ व्यापाऱ्यांनी दिली.

आशिया खंडातील थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया या देशांमध्ये रामबुतान या फळपिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गेल्या काही वर्षांपासून ड्रॅगन फळासारखे रामबुतानचे ही भारतात लागवड आणि उत्पादन घेण्यास सुरुवात झालेली आहे. थायलंड येथून रोपटे आणून केरळ, कोलकत्ता, जन्मू- काश्मीर, रत्नागिरी याठिकाणी सध्या लागवड करण्यात येत आहे. एपीएमसी बाजारात मागील वर्षी पर्यंत  परदेशी रामबुतान आयात करण्यात येत होते. मात्र यंदा बाजारात पहिल्यांदाच  जन्मू- काश्मीर आणि केरळ येथील  देशी फळ दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. यातून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी, कॉपर, प्रोटीन, आयर्न मिळते. सध्या बाजारात एक टन हुन अधिक फळांची आवक होत असून प्रतिकिलोला ५००रुपये बाजारभाव आहे. त्यामुळे याचे औषधी गुणधर्म बरीच असून ड्रगन फळासारखे ही याचे भारतात ही उत्पादन घेतले जात आहे अशी माहिती व्यापारी रामानंद जयस्वाल यांनी दिली आहे. 

रामबुतान फळाचे आरोग्यदायी फायदे

१. वजन कमी करण्यासाठी उत्कृष्ट

२. कोलेस्ट्रॉल कमी करते.

३. रामबुतान फळामध्ये फायबर असते जे पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी उपयुक्त ठरते.

४. रामबुतान फळांमध्ये मुबलक प्रमाणात फॉस्फरस असते . जे हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते .त्यामुळे दात आणि हाडे मजबूत करते. 

५. प्रतिकारशक्ती वाढवते

६. हायड्रेट आणि ऊर्जा देते.

७. मूत्रपिंड साफ करते.

८. त्वचा निरोगी ठेवण्यास फायदेशीर आहे.

९. रक्तातील साखर नियंत्रित करते त्यामुळे मधूमेहावर गुणकारी

१०. कर्करोग रोखण्यास मदत होते.

११. लोहाचा स्त्रोत

१२. शुक्राणूंची गतिशीलता सुधारते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मंकीपॉक्स रोखण्यासाठी दक्ष राहण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश