कुठे सोन्याने तुला करणारे राजे, कुठे ते सारे मुघल, बिगल!

औरंगजेब याने जेव्हा जिझिया कर आकारणी हिंदू धर्माविरुध्द सुरू केली तेव्हां महाराज त्यास खरमरीत पत्र लिहून म्हणतात, कोणाच्या धर्माला दोष दिल्यास जे ईश्वराने सांगीतले आहे तेच नाकारणे आहे. लोकांवर जुलूम झाल्यास लोक हाय, हाय करतील, दुःखाने धूर काढतील, या धुराने आपले शासन जितके लवकर जळेल, तितके साक्षात अग्नीने देखील जळणार नाही, गरीब माणसं ही चिलटे मुंग्यासारखी आहेत, त्यांना उपद्रव करण्यास काहीही अर्थ नाही.

  शिवराय यांचे समकालीन वागतात तसे महाराज नाही वागू शकत; कारण महाराज यांना जे वेड होते ते रामायण, महाभारत आणि आपल्या मातृ पितृ यांचे संस्कार विचारांचे! छत्रपती शिवाजी महाराज हे एक उच्च आणि सर्वोच्च असणाऱ्या संस्कृतीचे प्रतीक आहेत, म्हणून त्यांच्या कृतींना संस्कृतीची बंधने आहेत, त्यांची उक्ती आणि कृती यात आपणास साधर्म्य दिसते. संस्कृतीची बंधने त्यांच्या शत्रूंना मात्र अजिबात नाहीत.

शिवरायांचे शत्रू जर बघितले तर नेहमीच कमरेचे सोडून डोक्याला बांधायला तयार आहेत. त्यांचे शत्रू बघा, भर दरबारात वजीराचा  खून करणारा आदिलशहा, आपला सख्खा भाऊ दारा यास ठार मारणारा, बापाला कैदेत टाकणारा, युवराज संभाजीराजे यांना क्रूर शिक्षा देणारा औरंगजेब, पुण्यात बायका मुलांची कत्तल करणारा, भुपाळगड जिंकल्यावर किल्लेदाराचे हातपाय तोडणारा दिलेरखान, संशय आला म्हणून हिंदूंना पोत्यात घालून ठार करणारा जंजिरा किल्ला हबशी सिद्धी, मोहिमेवर निघण्यापूर्वी आपल्या साठपेक्षा अधिक बायकांची कत्तल करणारा अफजलखान असे महाराज यांचे शत्रू आजुबाजूस वावरत असताना, महाराज कोणत्याही मोहिमेत स्त्रियांना धक्का न लावण्याची तंबी देतात, तंबीची मर्यादा ओलांडल्यास त्याचा चौरंग करतात, भाजीच्या देठाला नखं न लावण्याचे फर्मान काढतात, उंबरखिंडत सैन्य शरण आले असता, कत्तल न करता माफ करतात, शत्रूस सन्मानपूर्वक कबर बांधून मान देतात, धिंड काढतो तो गुंड मानून, बंड करणाऱ्यास सजा ठोठावतात.

        महाराज एक संयमी भूमिका घेत औरंगजेब याने जेव्हा जिझिया कर आकारणी हिंदू धर्माविरुध्द सुरू केली तेव्हां महाराज त्यास खरमरीत पत्र लिहून म्हणतात, कोणाच्या धर्माला दोष दिल्यास जे ईश्वराने सांगीतले आहे तेच नाकारणे आहे. लोकांवर जुलूम झाल्यास लोक हाय, हाय करतील, दुःखाने धूर काढतील, या धुराने आपले शासन जितके लवकर जळेल, तितके साक्षात अग्नीने देखील जळणार नाही, गरीब माणसं ही चिलटे मुंग्यासारखी आहेत, त्यांना उपद्रव करण्यास काहीही अर्थ नाही. असे महाराज त्यास १६६९ मध्ये लिहलेल्या पत्रात म्हणतात. वास्तविक त्या काळी संपूर्ण हिंदुस्तानात कोणातच इतकी हिंमत नव्हती की, ते ओरंगजेब यास ठणका देऊ शकतील.  शिवराय आपल्याच एका अधिकाऱ्यास पत्र देत सूनावतात, की लोकास तुम्ही त्रास द्याल तर लोक म्हणतील की, मोगलाई बरी होती, लोकांचा तळतळाट होईल. एकूणच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य कारभारात पारदर्शकता होती, म्हणूनच सर्व देशात कुठल्याच राज्यांची जयंती साजरी केली जात नाही;  मात्र शिवराय यांचा कारभार का लोकशाही पूरक होता, त्यांनी त्या काळात आपला पंतप्रधान घोषित केला होता, त्यांचं मंत्रिमंडळ होते, आपल्या मुलास देखील त्यांना पंचासमोर उभे केले होते, इतके राजे सकस विचारधुरंधर होते. नियत जर बरी खरी आणि तरतरीत असेल तर आणि नियतीला आपणासमोर झुकावे, वाकावे लागते, मात्र आपलं वागणं हे सांगणं व्हावं, इतपत आपला आपल्या कर्मावर विश्वास आणि श्वासावर विश्व कोश निर्माण होण्याचे स्वप्न आपण बघितले पाहिजे. आदर हा कदर आणि चादर पेक्षा अधिक प्रगल्भ असतो, त्याची विण ही घट्ट घट्ट असते, अगदी महाराज यांच्या शब्द आणि वचन यांच्या सारखी! सदा राजमुद्रा बहारदार, विश्व कल्याण सारखी!
वाचत रहा...ऐकवत जा..अपरिचीत शिवराय! -प्रा. रविंद्र पाटील 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

जागतिकीकरण आणि मराठी भाषा