नोसिल नाका येथे नवी मुंबई मधील पहिली नाका कामगार निवारा शेड !

नवी मुंबई : कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दररोज सकाळी काम मिळण्यासाठी ठाणे- बेलापूर रस्त्यावरील नोसिल नाका येथे ऊन- पावसात उभे राहणारया महिला आणि पुरुष नाका  कामगारांना बसण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी यासाठी नोसिल नाका परिसरात वास्तव्यास असणारे भूमीपूत्र आमदार रमेशदादा पाटील यांनी नोसिल नाका येथे नवी मुंबई मधील पहिली सुसज्ज नाका कामगार निवारा शेड उभारली आहे. या  शेडमुळे नाका कामगारांना बसण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे.

नवी मुंबई मधील नाका कामगारांना मोठ्या प्रमाणात भेडसावणारे विविध प्रश्न सोडविण्यास आजही शासनाला अपयश आले आहे. काही ग्रामीण भागातील सुशिक्षित बेकारही नोकरी नसल्याने नाका कामगार म्हणून काम करीत  आहेत. नवी मुंबई मधील विविध नाक्यावर काम मिळण्यासाठी आल्यानंतर त्यांना बसायला सुद्धा जागा नसते. यामुळे महिला आणि तरुणींना फार त्रास होतो. या कष्टकरी  महिलां भगिनींना उभे राहावे लागत असल्याची  वेदना नोसिल नाका परिसरात वास्तव्यास असणाऱ्या भूमीपूत्र आमदार रमेशदादा पाटील यांच्या लक्षात आलयानंतर त्यांनी तात्काळ आपल्या आमदार निधीचा वापर करून ठाणे-बेलापूर महामार्गा शेजारी असणाऱ्या नोसिल नाका येथे नवी मुंबई मधील पहिल्या सुसज्ज अशा नाका कामगार निवारा शेडची निर्मिती केली आहे. यामुळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात बसण्याची सोय झाल्याने नाका कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे. 

नवी मुंबई परिसरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या नाक्यावर आपणास नाका कामगार मोठ्या संख्येने उभे राहिलेले दिसतात.आपले दैनंदिन जीवन जगण्यासाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी   ते नाक्यावर येऊन काम मिळेल.ही अपेक्षा त्यांना असते.परंतु कामगार नाक्यावर त्यांना बसण्यासाठी जागा असते ना उभे राहण्यासाठी!जिथे मोकळी जागा मिळेल.त्या ठिकाणी आसरा घेऊन काम देईल त्या घटकांची वाट पाहत असतात.परंतु तास दोन तास उभे राहिल्या नंतर त्रास,कंटाळा येतो.त्यावेळी कुठेतरी बसण्यासाठी नाका कामगार जागा शोधतो.ही बाब आमदार रमेश पाटील यांनी हेरली.त्यांनी क्षणाचाही विचार केला नाही.त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन कामगार निवारा शेडची मागणी केली.त्यानंतर सूत्र हलवुन नाका कामागार निवारा शेडची बांधणी आमदार निधीतील लाखो रुपायाचा खर्च करून करण्यात आली.

Read Previous

 ‘लवाद’च्या निर्णयाला उच्च न्यायालयाची अंशत: स्थगिती

Read Next

राष्ट्रीय डॉक्टर दीनाचे औचित्य साधून पुष्पगुछ देऊन सन्मान