मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर शाळा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाने सन्मानित
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने पटकाविले देशात अव्वल स्थान
पनवेल: माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने देशातील सर्वात स्वच्छ विद्यालयाचा होण्याचा मान पटकावत विशेष प्राविण्यासह देशात अव्वल स्थान मिळविले आहे. भारत सरकारच्यावतीने 'स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार' चा बहुमान मिळवणारे रायगड, नवी मुंबईतील हे एकमेव विद्यालय ठरले असून रायगड जिल्ह्याचा गौरव वृंध्दीगत करणारी अभिमानास्पद कामगिरी आहे.
भारत सरकारच्या वतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ साठी शाळांचे नामांकन मागविण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातून १ लाख ०३ हजार शाळांनी पुरस्कारासाठी नामांकन केले होते. त्या मधून जिल्हा व राज्य पातळीवर सर्वेक्षण करून माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर या शाळेला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्तरावर एकूण ६०६ शाळांची निवड करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातून माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर या शाळेला भारत सरकार व युनिसेफ यांच्यातर्फे राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१ - २२ जाहीर करण्यात आला आहे. आणि हा पुरस्कार १९ नोव्हेंबर २०२२ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या समारंभात केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी आज (गुरुवार, दि. १० नोव्हेंबर) रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, हेड बॉय मास्टर आदेश परेश ठाकूर आणि शाळेच्या कोऑर्डिनेटरर्स यांचा सन्मान करण्यात आला, तसेच जिल्हयातील विद्यालयाला हा राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे तो रायगड जिल्ह्यासाठी खुप अभिमानाची बाब आहे, असेही डॉ. पाटील यांनी नमूद करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, विद्यालयाच्या प्राचार्या, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.