पनवेलच्या डायलेसिस सेंटरचे पालक मंत्री आदीती तटकरे यांच्या हस्ते आज उदघाटन

पनवेल : पनवेल शहरातील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस सेंटर करिता तज्ज्ञांची निवड करून सेंटर सुरू करण्याची मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालक मंत्री आदीती तटकरे यांच्या हस्ते 2 जानेवारीला येथील डायलिसिस सेंटरचे उदघाटन होणार आहे. याचा लाभ शेकडो गरीब रुग्णांना होणार आहे. 

          पनवेल शहरातील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यास काही महिन्यापासून लागणारी उपकरणे देखील येथे बसवण्यात आलेली आहेत. परंतु तज्ञांची निवड करण्यात आली नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. रायगड जिल्ह्यातून येथे उपचार घेण्यासाठी अनेक रुग्ण येत असतात. किडनी आणि मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे खर्चिक असल्याने जिल्ह्यातील रुग्ण दगावण्याची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे तातडीने संबंधित विभागास आदेश देऊन नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात तज्ञांची निवड करून सेंटर सुरू करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका प्रीती जॉर्ज, डॉक्टर सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांनी राज्याच्या राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे. नवीन वर्षात डायलेसिस सेंटर सुरू होत असल्याने पनवेलकराना ही नववर्षाची भेट आहे. रायगडच्या पालकमंत्री आदीती तटकरे यांच्या हस्ते 2 जानेवारीला पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटरचे उदघाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला ऊपस्थित राहण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी केले आहे.

Read Next

15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारी रोजी 206 शाळांमध्ये सुरूवात