अनिकेत म्हात्रे यांचा राहुल गांधीकडून  सत्कार

नवी मुंबई-:कोरोना महामारीत सर्व सामान्य नागरिकांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या कोरोना योध्यांची दखल खासदर राहुल गांधी यांनी घेतली आहे. काँग्रेसच्या वतीने दिल्ली येथे महाराष्ट्रातील १३ कोविड योदण्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये नवी मुंबई मधून अनिकेत म्हात्रे यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते.व त्यांचा सत्कार राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आला.

नवी मुंबई क्षेत्रातील कोरोनाच्या संकट काळात आपल्या भागाबरोबरच संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी अनिकेत म्हात्रे यांनी अनेक उपक्रम राबविले . यामध्ये त्यांनी कोवित सणांसाठी मोफत रुग्णवाहिका तसेच ऑक्सिजन बेड व सिलेंडर , परपोच औषधे उपलका करून दिली . त्याचप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांच्यासाठी रिक्षा देखील तयार ठेवली होती . हातावर पोट असलेल्या परंतु लॉकडाऊनमुळे काम नसलेल्या अनेकांना अन्नधान्याचे किट , भाजीपाला , जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले . तसेच तयार जेवणाची देखील सोय केली होती . रुग्णांसाठी रुग्णालयाबाहेर तासनतास बसलेल्या नातेवाईकांना दुपारचे जेवण देण्यासाठी फूड बैंक सुरु करण्यात आली होती . त्याचप्रमाणे कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत अनेक ठिकाणी मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले . व त्यासाठी हेल्पलाईन देखील चालू केल्यामुळे नवी मुंबई परिसरातील अनेक नागरिकांना लस घेण्यासाठी मोठी मदत मिळाली . कोरोना काळातील अनिकेत म्हात्रे यांच्या या सर्व कामांची दखल काँग्रेसचे नेते व खासदार  राहुल गांधी यांनी घेतली . काँग्रेसच्या वतीने दिल्ली येथे महाराष्ट्रातील १३ कोविड योदण्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये नवी मुंबई मपून अनिकेत म्हात्रे यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते . राहुल गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला .

Read Previous

मराठा आराक्षण रद्द केल्याने मराठा समाज आक्रमक

Read Next

अनधिकृत इमारती समोरील जनजागृतीपर फलक काढणाऱ्यांवर यापुढे गुन्हे !