खारघर मधील पांडवकडा धबधबा सुरू करा- भाजपने  सिडकोकडे केली मागणी

खारघर : पावसाळा सुरू होताच पर्यटक खारघर पांडवकडा धबधबा कडे धाव घेतात. मात्र गेल्या काही वर्षांत पांडवकडा आणि तळोजा  धरणात काही पर्यटक बुडून मृत्यू झाल्यामुळे पांडवकडा धबधबा बंद ठेवण्यात येत असल्यामुळे पर्यटकांची हिरमोड होत आहे, धबधब्यावर सुरक्षा तैनात करून  करावे असे निवेदन खारघर मधील भाजपच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले.

    सह्याद्रीच्या  डोंगर कुशीत असलेल्या खारघर पांडवकडा धबधबा हा मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा असून   लाखो पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. पावसाळा सुरू होताच  पर्यटकांचा ओघ या पांडवकड्याकडे सुरू होतो, मात्र गेल्या काही  वर्षांपासुन पांडवकडा धबधबा शासनामार्फत बंद करण्यात येतो. पांडवकडा धबधबा हा खारघरला निसर्गाने दिलेली देणगी आहे. त्यामुळे सदर धबधब्यावर होणारे  अपघात टाळण्यासाठी सदर ठिकाणी  योग्य प्रकारे सुरक्षारक्षक तैनात करून पावसाळ्याच्या चार महिन्यांपुरता सदर परिसर पर्यटनासाठी खुला करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडळातील नगरसेवक व पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलाश शिंदे यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणिस  किर्ति नवघरे,जिल्हा चिटणिस  गिता चौधरी, जिल्हा उपाध्यक्षा संध्या शारबिद्रे, मंडल उपाध्यक्षा  बिना गोगरी, नगरसेवक अभिमन्यू पाटील, गुरुनाथ गायकर ,अभिमन्यू पाटील, वासुदेव पाटील, वैशाली प्रजाजती, गुरुनाथ म्हात्रे, गिरिश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठि आदि मान्यवर उपस्थित होते.

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

एफ.जी.नाईक महाविद्यालयात योग दिन संपन्न