आरटीओच्या उत्पन्नात यंदा ६१ कोटींनी वाढ
नवी मुंबई-:कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून नवीन वाहन खरेदीमध्ये घट झाल्याने वाहन नोंदणी कमी झाली होती.आणि त्याचा परिणाम आरटीओच्या सरासरी उत्पन्नावर झाला होता. मात्र यंदा आरटीओच्या उत्पन्नात सण २०२०-२१ पेक्षा वाढ झाली असून मागील वर्षीच्या तुलनेत सन २०२१-२२ मध्ये फेब्रुवारी पर्यंत उत्पन्नात ६१ कोटींनी वाढ झाली आहे. सन २०-२१मध्ये १७४ कोटी ६० लाख तर यंदा २३५कोटी ५२ लाख उत्पन्न झाले आहे.
राज्याच्या महसुलात वाढ करून तिजोरीत भर घालण्यात नवी मुंबई वाशी उपप्रादेशिक परिवहनाचा मोठा वाटा असतो. टाळेबंदीत सर्व सरकारी कामकाज ऑनलाइन करण्यात आले होते. मात्र ऑनलाइनला बहुतांशी पसंती दिली गेली नाही. नवी मुंबई शहरात विविध वाहने,रिक्षा यांची मागणी वाढत असते, तसेच व्हीआयपी नंबर साठी मोठी मागणी असते. त्यामुळे या विभागात नेहमीच मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. मात्र करोनामुळे व्यवहार ठप्प असल्याने उत्पन्नात घट झाली होती. नवी मुंबईत नवीन वाहन नोंदणी,रिक्षा परवाना, रस्ते कर, वाहन परवाना,प्रमाणपत्र नूतनीकरण ,व्ही आय पी नंबर अशा विविध स्रोतातुन मागील वर्षी २०-२१मध्ये १७४कोटी ६०लाख रुपये तर यंदा २१-२२फेब्रुवारी पर्यंत २३५ कोटी ५२लाख रुपये उत्पन्न झाले आहे. त्यामुळे यंदा ६१कोटींनी उत्पन्नात वाढ झाली आहे पुढील एक महिन्यात आणखीन वाढ होणार आहे.