नेरुळ बि विभाग अधिकाऱ्यांची अनधिकृत बांधकामावर दिखाव्याची कारवाई 

वाशी :- महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयाकडून नेरूळगाव मधील गावठाण भागातील अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यात आली. कारवाईच्या नावाखाली कारवाईची केवळ नौटंकीच पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात आल्याचे काही मिनिटातच स्पष्ट झाले. पालिका आयुक्त बांगर  यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याकरताच नेरूळ विभाग कार्यालयाने ही कारवाई केली असल्याचे पालिका वर्तुळात बोलले जात आहे.अश्या विभाग अधिकारी यांचा नागरीसत्कार करण्याची पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या कडे हिराजी विठ्ठल भोपी यांनी  वेळ मागितली आहे. 

  गेल्या दीडवर्षांपासून हिराजी विठ्ठल भोपी यांनी  नेरुळगाव येथील गावठाण भागात अनधिकृत  बांधकाम संदर्भात लोकआयुक्त, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सिडको, पालिका आयुक्त यांच्या कडे वर्षापासून अनधिकृत बांधकाम होत असल्याचे पत्रव्यवहार  करण्यात आले आहे. संपूर्ण नवी मुंबई मध्ये अनधिकृत बांधकाम करण्याचा पेवा फुटला असताना वरच्या पातळीवरून आयुक्त यांच्यावर दबाव येत असल्यामुळे आयुक्त यांनी आठ ही प्रभागात होत असलेल्या अनधिकृत बांधकाम निस्तानाभूत करण्याचे सर्व विभाग अधिकाऱ्यांना आदेश दिलेले असताना आदेशाची पायमल्ली होत असून धूळफेक करीत असलेल्या विभाग अधिकारी यांच्या नागरीसत्काराची वेळ मागितली आहे. अतिक्रमणाबाबत स्थानिक रहीवाशांमध्ये कमालीचा संताप असतानाही इमारतमालका  कडून मिळणार्‍या चिरीमिरीमुळेच त्यांना पालिकेच्या नेरुळ विभाग अधिकारी व अतिक्रमण विभागाकडून राजाश्रय मिळत असल्याचा आरोप स्थानिक रहीवाशांकडून केला जात आहे. तसेच ह्या बांधकामाला पाणी व शिवरेज कनेक्शन महानगरपालिके कडून देण्यात आले आहे. गुरुवार 20 जानेवारी रोजी कारवाई करण्यात आली.  तिसऱ्या मजल्यावरील असलेल्या दहा कॉलम पैकी एकाच कॉलम मधील सिमेंट काढून  नाममात्र कारवाई करण्यात आली. या कारवाईत बांधकामाची फारशी हानी होणार नाही याची महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडून विशेष दक्षता घेण्यात आली.त्याचे पुरावे छायाचित्रातून दिसत आहे. बांधकामवाल्यांकडून मिळणार्‍या प्रेमामुळेच पालिका आयुक्त बांगर  यांच्या डोळ्यात धुळफेक करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

अनधिकृत बांधकाममालकाचे राजकीय लागेबांधे असल्यामुळे  व  चिरीमिरी मिळत असल्यामुळेच पालिका प्रशासन कारवाईस  टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे. अनधिकृत बांधकामाची  पाहणी केल्यास त्यांना पालिकेच्या अतिक्रमण कारवाईची नौटंकी लगेचच निदर्शनास येईल. तरी नेरूळ विभागा अधिकारी यांनी जी कारवाईची नौटंकी केली आहे. त्यांचा नागरीसत्कार करण्यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी परवानगी द्यावी अशी मागणी हिराजी विठ्ठल भोपी यांनी केली आहे. 

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

आरटीओच्या उत्पन्नात यंदा ६१ कोटींनी वाढ