तुर्भेत बोगस स्टाॅलवर मनपाची कारवाई
नवी मुंबई-:तुर्भे विभागात बनावट परवाना क्रंमांक टाकून काही स्टाॅल धारकांनी व्यवसाय सुरू ठेवला होता. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मनपा अतिक्रमण विभागामार्फत स्टोलचे परीक्षण करून कागदपत्रांची छाननी करण्यात आली. त्यात सात ते आठ स्टाॅल दोषी आढळून आल्याअसुन त्या स्टोल व आता कारवाई करण्यात येत असून मंगळवार दिनांक ११ जानेवारी रोजी ३ स्टाॅलवर कारवाई केली.
नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने काही फेरीवाले व दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी परवाना स्टाॅल वितरित केले होते. मात्र याचा गैर फायदा घेत काही नागरीकांनी या परवाना धारक स्टोल क्रमांकनुसार दुय्यम क्रमांक (दुबार) टाकून बेकायदेशीर स्टोल तुर्भे विभागा अंतर्गत टाकले होते. त्यामुळे या स्टोल धारकांची चौकशी करून त्यांच्या कागद पत्रांची छानणी करण्याबाबत तक्रारी तुर्भे विभागास प्राप्त झाल्या होत्या.आणि त्यानुसार या स्टोलच्या कागद पात्रांची छाननी करण्यात आली होती. त्यात सात ते आठ स्टाॅल धारक दोषी आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर तुर्भे अतिक्रमण विभागामार्फत मंगळवार दिनांक ११ जानेवारी रोजी कारवाई करण्यात असून तीन स्टाॅल मनपाने उचलून नेले आहेत.तर अशा स्टाॅलची अजून पडताळणी सुरू असून कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे छाननी मध्ये जे स्टाॅल दोषी आढळतील त्या सर्व स्टाॅल धारकांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती तुर्भे विभाग अतिक्रमण अधिकारी हेमचंद्र पाटील यांनी दिली.