अनवाणी : श्रद्धा की अंधश्रद्धा
लोकगर्दीत बाप्पा गावाला गेले. काहींनी कृत्रिम तलावाचा आश्रय घेऊन सुखावले; तर काही सागरात ढोल ताशाच्या गजरात. मग काकस्पर्श. नुसतेच टच अँड गो ! सुटलो बाबा बापाच्या तावडीतून. आधी बाप्पा मग बापा. लगेचच आईचा जागर. ज्या आईने पोटात वाढवले, आतापर्यंत सारे जग दाखवले तीला दुखावतो; तिच्यासाठी फक्त एक औपचारिकता आणि मंडपातल्या नवदुर्गेसाठी अगदी अनवाणी, काही निर्जली; काही फक्त फलहारी. तर ही अनवाणी श्रद्धा? किती भयानक! कुठल्या ग्रंथात लिहिले आहे ? काय शास्त्र सांगतं? अनवाणी फिरून देवाकडे भरपूर मागणाऱ्यांनी समाजाला द्यावे. अडल्या नडलेल्याना मदत करावी.
श्रद्धा-अंधश्रद्धा या विल्यम शेक्सपियरच्या ओथेल्लो नाटकातील भूमिकेसारख्या असतात. टु बी ऑर नॉट टु बी जगावं की मरावं की जगून मरावं. यातील जगून मरावं या भूमिकेतून आपण जगत असतो. कारण आपल्या कडे तेवढाच पर्याय असतो. एकंदरीतच संपूर्ण भारतीय नागरिकांपैकी किमान सत्तर ते ऐशी टक्के लोक श्रद्धाळू कम अंधश्रद्धाळू आहेत आणि गंम्मत अशी की ते मान्य करतच नाही की ही अंधश्रद्धा आहे. यात दोन जमाती आहेत मी जमाती हा शब्द मुद्दामून वापरतोय. कारण एक पूर्ण नास्तिक असणे ही देखील श्रद्धाच आहे. तेव्हा काही गमतीशीर श्रद्धेच्या पण वैचारिक अंधत्वाने समाजात रूढ झालेल्या एका गोष्टीचा मी समाचार घेत आहे. म्हणजे मला विज्ञाननिष्ठ उत्तर हवे आहे पटलं तर नतमस्तक होईन. नुकतेच गणरायाचे विसर्जन झाले. स्वयंसिद्ध महान कार्यकर्त्यांनी मेहनत करून रात्रीचा दिवस आणि दिवसा रात्रीची झोप घेऊन बाप्पाची सेवा केली. वर्गणीचे रेट ठरवून रस्ते गल्ल्या विभागीय नेते यांचे उभे आडवे बॅनर यांनी दिलेल्या देणग्या त्यामुळे संपूर्ण चौक भरून गेले. फारच क्वचित टिळक दिसले. असो; तरीही राजे नव्या तरापयावर विराजमान व्हायला तयार नव्हते. मग कोळी बांधव आणी भरती ओहोटीची वेळ याचा मेळ घालून राजे आपल्या गावी निघून गेले. श्रद्धा अंधश्रद्धा मीडिया आणि सामान्य माणूस यांची लुटूपुटूची लढाई होऊन महान कार्य आटोपलं.
काही मंडळाचे तंबू उठले. अ श्रेणीतले कार्यकर्ते दानपेट्या उघडण्यात गर्क झाले. यंदा पाऊस अति प्रमाणात झाल्यामुळे सगळंच वाहून गेलं. अतिवृष्टीमुळे अश्रू कुणालाच दिसलेच नाही; ज्यांना दिसले ते बांधावर जाऊन आले, काही ठिकाणी बांधच नव्हते. देवभूमीत सुद्धा आक्रित घडलं निसर्गरम्य देवराई चिनार वृक्ष आणि चिनाब नदी सगळंच घेऊन गेली. मग विघ्नहर्ता कुठे गेला. तरीही आम्ही देव पूजले. मनातला देव्हारा करून आठतास राजाला भेटायला गेलो माना वर करून स्वतःला चिरडून अनवाणी गेलो. अनेकांची पाकिटे होती, काहींची मंगळसूत्र तुटली, तेवढ्यात कुणीतरी किंचाळले..अमुक तमुक खान आला. सगळ्यांचे लक्ष खानावळीकडे! राजाकडे दुर्लक्ष. पण कृतकृत्य झाल्यासारखे वाटलं. राजाच्या दर्शनाने नाही खानाच्या दर्शनाने. चला अथांग लोकगर्दीत बाप्पा गावाला गेले. काहींनी कृत्रिम तलावाचा आश्रय घेऊन सुखावले; तर काही सागरात ढोल ताशाच्या गजरात. मग काकस्पर्श. नुसतेच टच अँड गो सुटलो बाबा बापाच्या तावडीतून. आधी बाप्पा मग बापा. लगेचच आईचा जागर. ज्या आईने पोटात वाढवले, आतापर्यंत सारे जग दाखवले तीला दुखावतो; तिच्यासाठी फक्त एक औपचारिकता आणि मंडपातल्या नवदुर्गेसाठी अगदी अनवाणी, काही निर्जली काही फक्त फलहारी. तर ही अनवाणी श्रद्धा? किती भयानक! कुठल्या ग्रंथात लिहिले आहे ? काय शास्त्र सांगतं? असंख्य प्रश्न अर्थातच मला पडले.
या वर्षी तर कहरच केला जो शेतकरी कायमच शेतात अनवाणी असतो त्याला किती नवसाला पावले पाहिजे. जो सियाचिन ग्लशियार मध्ये रक्त गोठावणाऱ्या थंडीत देशाचे रक्षण करीत असतो. असाच एक पंथ आहे जो ही अंधश्रद्धा जोपासतो घरातून मंदिरात जातानाच अनवाणी जातो. कारण पायाखाली जिवडा मरतो, शक्यतो दात घासत नाही. किडे मरतात, हत्या होते. बाकी व्यापार करताना पाच रुपयांची वस्तू पन्नास रुपयाला विकताना गरीब श्रीमंत न पाहता जिवंत मारतो तेव्हा हत्या होत नाही का? ही अशी समाजाची पीछेहाट करणारी वैचारिक दिवाळखोरी प्रगत समाजाला कुठे नेऊन ठेवणार आहे ? यालाच मी निर्बुद्ध श्रद्धा म्हणतो. यावेळी सर्वच धार्मियांनी त्यात गणेशोत्सव-नवरात्री मंडळ यांनी काही ठराविक रक्कम जी दानपेटीत श्रद्धेने नागरिकांनी टाकलेली असते ते दान सत्पात्री ठरावे. अनेक राजकीय पक्षांनी मदतीचा हात पुढे केलाच असेल. सरकारने किंवा सर्वच पक्षांनी अति बॅनरबाजी न करता मदत करावी. ही श्रद्धा त्याच बरोबर शेतकऱ्यांनी सुद्धा नागरिकांना सामान्य जनतेला बाजारभाव मिळत नाही म्हणून रस्त्यावर दूध कांदा फेकू नये. शेकडो एकर जमीन असूनही सरकारी तिजोरीत एक पैका न भरणाऱ्या थैलीशाही आबा बाबा दादा सम्राटानी आपल्या गंगाजळीतले थोडे ओंजळभर पाणी सर्वच नागरिकांना द्यावे. ही खरी श्रद्धा.
अनवाणी फिरून देवाकडे भरपूर मागणाऱ्यांनी समाजाला द्यावे. अडल्या नडलेल्याना मदत करावी आता शाळाच उरल्या नाही त्या उभ्या कराव्या एक मंदिर शंभर भिकारी पैदा करते पण एक शाळा हजार सुजाण नागरिक तयार करते अशा देश भक्तांची गरज आहे परमेश्वर म्हणजे निसर्ग पंचमहाभुते म्हणजे देव श्वास म्हणजे देव आपली जन्मभूमी म्हणजे जागृत देवस्थान ते कधीच विसरून जाऊ नका. श्रद्धेला कधीच चौकटीत बांधू नये. संध्याकाळची किरणे लांबली माझी सावली देखील लांब पसरली होती, जी कधीच माझी नव्हती. छत्रपतींच्या पुतळ्याजवळ मी फक्त नतमस्तक झालो. कारण लेख उगाचच लांबवायचा नव्हता..त्या सावल्यांसारखा. - राजन वसंत देसाई