मोरबे धरण क्षेत्रात १०४ मी.ली.पावसाची नोंद
नवी मुंबई-:मागील वर्षी प्रमाणे यंदा देखील सप्टेंबर महिना उजाडला तरी मोरबे धरण ओव्हरफ्लो झाले नसले तरी धरणात आता पर्यत ८६.८६% पाणी साठा तयार झाला आहे.नवी मुंबईला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण क्षेत्रात यंदा जून महिन्यापासून पावसाची रिपरिप कमी होत असल्याने यंदा नवी मुंबईकरांवर पाणी कपातिचे संकट ओढवते का?अशी अशी भीती निर्माण झाली होती.कारण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धरणात अवघा ४२ % पाणी साठा शिल्लक होता.मात्र मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता.व व धरणाची पाण्याची पातळी वाढली होती. मंगळवार दिनांक ३१ऑगस्ट रोजी धरण क्षेत्रात १०४.६० मी.ली. पावसाची नोंद झाल्याने धरणाच्या पाणी पातलीत वाढ होऊन ८५.३५ मीटर व गेली आहे. तर धरणात ८६.८६ % पाणी साठा तयार झाला आहे.मोरबे धरण ८८मीटर ला धरण पूर्ण भरते.