ईलु सायकचे आणखी १०० स्टँड शहरात वाढणार
नवी मुंबई-:नवी मुंबई शरहरातील वाढते प्रदूषण पाहता व नागरिकांचे आरोग्य डोळ्यासमोर ठेऊन नवी मुंबई महानगर पालिकेने एका खाजगी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तीन वर्षांपूर्वी जन सायकल प्रणाली युलु सायकल सुरुवात करण्यात आली होती. मात्र या जबसायकल योजनेला नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून शहरात इतर ठिकाणी देखिल सायकल स्टँड बनवावे अशी मागणी होत आहे. त्यामुळे ही मागणी लक्षात घेता मनपा शहरात आणखी १०० ई सायकल चे स्टँड वाढवणार आहे.
नवी मुंबई मुंबई सारख्या आधुनिक शहरात मोठ्या प्रमाणात वाहन संख्या असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत चालली आहे. आणि अशा या वाढत्या वाहन संख्येच्या शहरात सायकल नावाचा प्रकार नाममेश होण्याच्या मार्गावर होता.मात्र वाढत्या वाहन संख्येमूळे होणारे प्रदूषण पाहता व नागरीकांचे चांगले आणि आरोग्यदायी,तंदुरुस्त जीवनमान राहण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने जनसायकल योजना सुरू केली.. या आणि या सायकलिंगकला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून नवी मुंबईकर युलू सायकल, ई बाईक अधिक वापरत असल्याचे समोर येत आहेत . विशेषतः सकाळी, सायंकाळी या प्रणालीचा वापर अधिक होताना दिसत आहे. शहर प्रदुषणमुक्त व पर्यावरणशील राहण्यासाठी छोट्या छोट्या अंतरावर जाण्याकरीता इंथनयुक्त वाहन न वापरता इंथनमुक्त सायकल अथवा इ-बाईकचा वापर करावा या हेतूने ही सेवा उपलब्ध करण्यात आली. मागील वर्षीचा मुख्य टाळेबंदी काळ सोडला तर नंतर टाळेबंदीत मिळालेल्या शिथिलतेत या युलु सायकल आणि ई बाईकचा वापर वाढला होता .त्यामुळे शहरात आणखी सायकल स्टँड वाढवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे महापालिका येत्या दिवाळी पर्यत आणखीन १०० ईलु सायकल स्टँड वाढवणार असल्याची महिती महापालिका अधिकारी यांनी दिली आहे.
नवी मुंबई शहरात सध्या १०० ईलु सायकल स्टँड च्या माध्यमातून ७०० सायकली आहेत.आणि मागील तीन वर्षात दीड लाख नागरीकांनी याचा उपयोग केला आहे.त्यामुळे वाढता वापर आणि मागणी पाहता महापालिका १०० सायकल स्टँड ची भर घालणार असून दिवाळी पर्यत शहरात एकूण २०० सायकल स्टँड कार्यरत असतील.
सध्या धावपळीच्या,तणाव, व्यापाच्या जीवनात बहुतांशी नागरिक सुदृढ राहण्यासाठी नित्याने चालणे, योगासने करणे यावर अधिक भर देत आहेत. आजच्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या गराड्यात नागरिकांना सायकलचा विसर पडला होता. तसेच काही नागरिकांची सायकलिंग करण्याची इच्छा ही असते,परंतु आजमितीला सायकल हे वाहन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एक घरात दुचाकी,चार चाकी वाहने पाहायला मिळतात सायकल मात्र कोणाकडे पाहायला मिळत नाही. पंरतु शहरात सुरू झालेल्या या युलू सायकल आणि ई बाईकने ही सर्व कमतरता भरून काढल्याचे पहावयास मिळते आहे.