शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर नवी मुंबईकरांच्या सेवेत

पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले लोकार्पण

नवी मुंबई :- ऐरोली येथील चिंचपाडा झोपडपट्टीमध्ये  उभारण्यात आलेल्या  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटरचे लोकार्पण आज नगर विकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  झाले. या कोविड सेंटरची समता एकूण शंभर बेड ची असून सर्वच बेडवर ऑक्सीजन ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 17 बेडवर आय सी यु आणि व्हेंटिलेटर तैनात ठेवण्यात आले आहेत. लहान मुलांसाठी विशेष वॉर्डही या ठिकाणी तयार करण्यात आला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल प्रमाणे उपचार मिळणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि मीनाताई रहिवासी संघ यांच्या वतीने चिंचपाडा येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या धर्तीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर उभा करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शिवसेना खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, दिलीप घोडेकर, शहर प्रमुख विजय माने, माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, नवीन गवते, एम के मढवी, माजी नगरसेवक ममित चौगुले, सोमनाथ वास्कर, राजू पाटील,  सुरेश भिलारे, आकाश मडवी, चेतन नाईक, जगदीश गवते, रामआशिष यादव, बहादुर बिष्ट, अपर्णा गवते, दीपा गवते, शुभांगी गवते, इंद्रावती रुग्णालयाचे सीईओ शंकर चव्हाण आदी उपस्थित होते.

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जोरदार तयारी

देशात आणि राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून झोपडपट्टी मध्ये उभा राहिलेले हे अत्याधुनिक कोविड सेंटर फक्त गौरवास्पद नाही, तर अन्य शहरांना एक वेगळी दिशा दाखविणारे आहे, अशी प्रतिक्रिया या वेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

चिंचपाड्याचे रस्ते उजळले

खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून चिंचपाडा येथे बायोगॅस प्रकल्प उभा राहिला आहे. हा प्रकल्प कचऱ्यावर चालतो. या प्रकल्पाचे उद्घाटनही आज पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आणि चिंचवड यातील सर्वात रस्ते उजळून निघाले.  प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर चिंचपाड्यातील सर्वच रस्त्यावर असलेल्या पथ दिव्यांसाठी करण्यात आला आहे.

Read Previous

‘जुन्नर’चा केशर आंबा एपीएमसी फळ बाजारात दाखल

Read Next

नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या  रौप्य महोत्सवी वर्ष निमित्त "आरोग्य उत्सव" आरोग्य शिबिराचे आयोजन