मोदी सरकारच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस चे निषेध आंदोलन
नवी मुंबई-: केंद्रातील मोदी सरकार मार्फत सध्या खाजगीकरणाचा सपाता लावला आहे.सरकारच्या या चुकीच्या निर्णयामुळे तरूणांचे भवितव्य धोक्यात आले असून याचा निषेध करण्यासाठी नवी मुंबई काँग्रेस च्या वतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी निषेध आंदोलन करण्यात आले.
केंद्रात असलेल्या मोदी सरकारने ' राष्ट्रीय मित्रिकरण ' योजनेच्या माध्यमातून अधिकृतपणे भारताची सार्वजनिक मालमत्ता विक्रीतून देशच विकायला काढला आहे. लोकांच्या कष्टातून उभी राहिलेली सरकारी मालकीची मालमत्ता मोदी यांनी आपल्या भांडवलदार मित्रांच्या माध्यमातून विकायला सुरूवात केली आहे. सरकारने ४०० रेल्वे स्टेशन, १५० गाड्या, पॉवर ट्रान्समिशन नेटवर्क, पेट्रोलियमचे नेटवर्क, सरकारी गोदामे, २५ विमानतळे आणि १६० कोळसा खाणी विकल्या. हे सर्व उभारण्यासाठी ७० वर्ष लागली. तरूणांचे भविष्य विकले जात आहे. तीन-चार लोकांना भेट म्हणून ही देशाची संपत्ती दिली जात आहे. मोदी सरकारच्या या चुकीच्या निर्णयामुळे तरूणांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. . राहुलजी गांधी यांनी ही गोष्टी आधीच ओळखून तरूणांना या संदर्भात धोक्याचा इशारा दिला होता. तसेच या गोष्टीला विरोध करण्यासाठी हैशटॅगच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येण्याचे देखील आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार तसेच राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवासजी व कोकण विभागाचे प्रभारी प्रदीप सिंधव यांच्या आदेशानुसार बुधवार दि. २५ ऑगस्ट रोजी नवी मुंबई क्षेत्रातील वाशी सेक्टर १७ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वात आणि नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील मोदी सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी नवी मुंबई काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता नासीर हुसैन, महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा उज्वला साळवे, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संदेश बनसोडे, सरचिटणीस अभिषेक पाटील, नवी मुंबई काँग्रेस कमिटीचे सचिव विनोद पाटील, नवी मुंबई युवा कॉंग्रेसचे सरचिटणीस विजय पाटील, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सचिव श अशोक सोनवणे , दीपक कोणाले नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सचिव सुरेश मानवतकर , वाशी ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन नाईक, नवी मुंबई सोशल मीडिया जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजस भांबुरे , ऐरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सोशल मीडिया समन्वयक सुर्यकांत निवडुंगे, कोपरखैरणे ब्लॉक अध्यक्ष धोंडीराम पाटील, वॉर्ड क्र. २१ चे अध्यक्ष नितीन शेट्टी, घणसोली ब्लॉक उपाध्यक्ष साहेबराव बाजड, वॉर्ड क्र. २५ चे अध्यक्ष मोहन पोयरेकर, दिघा ब्लॉक सोशल मीडियाचे अध्यक्ष रॉबिन तसेच कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.