नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर

नवी मुंबई-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह  वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.आणि त्याचे पडसाद नवी मुंबईत देखील उमटले असून शिवसैकांनी यावेळी निषेध व्यक्त करत रास्तारोको केले.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आणि या विरोधात राज्यभर शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.नवी मुंबईत देखील या विरोधात आंदोलन करण्यात आले.महापालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली मध्ये आंदोलन करण्यात आले व यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राणे यांचा पुतळा जाळण्यात आला.तर वाशीत जिल्हाध्यक्ष विट्ठल मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.याववेळी छत्रीपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करून नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून राणे यांना अटक करण्यासाठी रबाले आणि वाशी पोलीस ठाण्यात शिवसैनिकांनी तक्रारी दिल्या आहेत.

Read Previous

 ‘लवाद’च्या निर्णयाला उच्च न्यायालयाची अंशत: स्थगिती

Read Next

कामगार संघटनेच्या नामफलकाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते अनावरण