महापालिका कर्मचाऱ्यांच्या पीएफबाबतचे प्रश्न मार्गी

नवी मुंबई : महापालिका प्रशासनातील घंटागाडी विभागातील कर्मचारी, परिवहन सेवेतील कंत्राटी कर्मचारी, शिरवणे व  महापे एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांच्या पीएफबाबतच्या रेंगाळलेले अनेक प्रश्न कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोडविण्यात महाराष्ट्र कर्मचारी युनियनला यश आले आहे.

बऱ्याच महिन्यांपासून महापालिका सेवेतील तसेच एमआयडीसी विभागातील कर्मचाऱ्यांचे पीएफसंदर्भात बरेच प्रश्न प्रलंबित होते. कर्मचारी पीएफ कार्यालयात चकरा मारुनही कोणी त्यांना दाद देत नव्हते. त्यातच पीएफची कार्यवाही ऑनलाईन झाल्याने कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढतच गेल्या. महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली पालिका व एमआयडीसी कर्मचाऱ्यांच्या पीएफ विषयक समस्या सोडविण्यासाठी शिष्टमंडळ वाशीतील पीएफ कार्यालयात गेले होते. या शिष्टमंडळात महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे वाहन विभागाचे राजन सुतार, परिवहन ठोक मानधन विभागाचे अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, देसाई बुवा व एजी इन्वा रो कंपनीचे मॅनेजर सहभागी झाले होते. या वेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या पीएफच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करताना कामगार नेते रविंद्र सावंत यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या व त्यातून निर्माण झालेल्या अडचणी पीएफ अधिकाऱ्यांसमोर विषद केल्या.

या चर्चेदरम्यान सर्वप्रथम घंटागाडी विभागातील ८० कर्मचाऱ्यांच्या पीएफविषयक प्रश्न मार्गी लागला. यासोबत महापालिका परिवहन विभागातील कंत्राटी कर्मचारी, शिरवणे तसेच महापे एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या कथन केल्या. पीएफ अधिकाऱ्यांना तात्काळ संबंधितांना बोलावून या समस्यांचे निवारण करण्याचे निर्देश दिले. या बैठकीतील कर्मचाऱ्यांचे पीएफविषयक रेंगाळलेले समस्या मार्गी लागल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळाला असल्याची प्रतिक्रिया कामगार नेते रविंद्र सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी परिसरात महापालिका पे अँड पार्किंग ठेकेदाराकडून बेकायदेशीर पार्किंग वसुली?