रेल्वे प्रशासनाच्या विरोधात रिपाई (आठवले गट) तर्फे स्वाक्षरी मोहीम

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे नुकतीच स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

रेल्वे स्थानकात अपंग, ज्येष्ठ नागरिकांकरिता स्वयंचलित पायऱ्या आणि लिपटची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे-पनवेल, ठाणे-नेरुळ आणि ठाणे-वाशी मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात, महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षतेसाठी रेल्वे स्थानकात महिला रेल्वे पोलीस नेमण्यात यावेत तसेच पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी, रेल्वे स्थानकामध्ये सुलभ शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची दुरावस्था असल्याने हा प्रश्न सोडवावा तसेच प्रत्येक रेल्वे स्थानकाबाहेर दोन्ही बाजूला रेल्वे तिकीट घराचे सुविधा उपलब्ध करुन द्यावी, यांसह अनेक मागण्यांची तड लावण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे ‘रिपाई'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांमध्ये स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्वाक्षरी मोहिमेत नेरुळ रेल्वे स्थानक येथे ‘रिपाई'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे, कार्याध्यक्ष धरमसी पटेल, सरचिटणीस एल. आर. गायकवाड, कोपरखैरणे रेल्वे स्टेशन येथे ‘रिपाई'चे नवी मुंबई कार्याध्यक्ष विजय कांबळे, प्रमुख संघटक नारायण मोरे, घणसोली रेल्वे स्थानक येथे ‘रिपाई'चे नवी मुंबई प्रवक्ते सचिन कटारे, सचिव प्रकाश तुळसे, ऐरोली येथे ‘रिपाई'चे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष टिळक जाधव, बेलापूर विधानसभा अध्यक्ष महेश कांबळे, बेलापूर रेल्वे स्थानक येथे सुनील रसनभैरे, वाशी रेल्वे स्थानक येथे आयुब खान, जुईनगर येथे घोडके, तुर्भे येथे रमेश जोगदंड, सीवूड्‌स येथे महेश जंगले, ‘रिपाई'चे घणसोली विभाग अध्यक्ष सोमा कांबळे, सरचिटणीस संकेत पवार, मंगेश गायकवाड, अशोक जाधव, वसंत जाधव, भीमराव तायडे, बालाजी कांबळे, बाबू गायकवाड, मंगेश रणदिवे, अनंत तांबे, अनंत पवार, रवी गायकवाड, सागर कसबे, विनय मसुरकर, धम्मपाल नीखडे, आश्विन कुमार धस्के, प्रकाश सुरवाडे, बाबासाहेब डाके, चाबुकस्वार, साठे, विजय पगारे, विजय दांडके, राजू कांबळे आदींसह ‘रिपाई'चे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर बसविण्याचे काम तात्काळ थांबवा