‘सिडको'च्या कारवाई विरोधात प्रीतम म्हात्रे आक्रमक

उरण : ‘सिडको'ने शहर वसवले; परंतु गांवठाण मधील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली वाढीव बांधकामे कायम करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. ‘सिडको'च्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची बांधकामे तोडण्यासाठी नियमाच्या विरुध्द अनेक वेळा कारवाई केली जाते. १७ जानेवारी रोजी अशाच प्रकारे गव्हाण ग्रामपंचायत विभागात ‘सिडको'ने कारवाई केली. याची माहिती मिळताच शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी सिडको प्रशासनाविरुध्द नागरिकांच्या बाजुने रस्त्यावर उतरले. त्यांनी सदर कारवाईला विरोध करीत कारवाई थांबवण्यास भाग पाडले.

प्रीतम म्हात्रे यांनी पोकलेनवर चढत ‘सिडको'च्या कारवाईला विरोध केला. वाढीव बांधकाम नियमानुसार परवानगी देऊन कायम करण्यासाठी लवकरच बैठक बोलवून निर्णय घेण्यात येईल. स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी शेकाप नेहमी सोबत आहे, असे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.

शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी घेतलेल्या तीव्र आंदोलनाच्या भूमिकेमुळे गव्हाण येथे तोडक कारवाईसाठी आलेल्या ‘सिडको'च्या पथकाला माघारी फिरावे लागले. उलवे नोड परिसरातील गव्हाण गावात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बांधलेल्या बांधकामांवर १७ जानेवारी रोजी ‘सिडको'चे अतिक्रमण विभाग पोलीस फौजफाट्यासह हातोडा मारण्यासाठी गव्हाण गावात पोहोचले होते. याची माहिती प्रितम म्हात्रे याना मिळताच ते प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत गव्हाण गावात पोहचले आणि ‘सिडको'ने सुरु केलेली तोडक कारवाई थांबवण्याची मागणी केली. तसेच सिडको जोपर्यत्त तोडक कारवाई थांबवत नाही, तोपर्यत्त आम्ही इथून हलणार नाही, असा पावित्रा त्यांनी यावेळी घेतला.

सदर कारवाईला विरोध करण्यासाठी शेकाप नेते प्रितम म्हात्रे यांच्यासोबत माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी उपसरपंच सचिन घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, ‘शेकाप'चे तालुका चिटणीस राजेश केणी, शेखर शेळके राजेश केणी, जितेंद्र म्हात्रे, अरुणशेठ भगत, रोशन घरत, हेमंत पाटील, सचिन येरुंकर, राकेश घरत, रुपेश मोहिते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 रेल्वे प्रशासनाच्या विरोधात रिपाई (आठवले गट) तर्फे स्वाक्षरी मोहीम