महिलांच्या हक्काचा शिधा जातोय कुठे?

डोंबिवली : महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, लाडक्या बहिणींचा हक्काचा शिधा जातोय कुठे? असा संतप्त प्रश्न डोंबिवलीतील २०० कुटुंबियांनी उपस्थित केला आहे.

डोंबिवलीतील क्रांतीनगर  झोपडपट्टी मधील रहिवाशांनी थेट सरकारवर नाराजी व्यक्त करत आपले लाडक्या बहिणींना शिधा न देणारे कसल सरकार? असा थेट जाबच विचारला आहे. १६ जानेवारी रोजी येथील रहिवाशांनी यासंदर्भात बैठक घेतली. तर १७ जानेवारी रोजी रहिवाशांनी डोंबिवली पूर्वकडील शिधावाटप कार्यालयात अधिकारी दीपक डोळस यांची भेट घेऊन निवेदन दिले.

डोंबिवली पूर्वेकडील टंडन रोडरील क्रांतीनगर झोपडपट्टीमध्ये १६ जानेवारी रोेजी मच्छिंद्र तांदळे यांच्या उपस्थित बैठक पार पडली. यावेळी महिलांनी रेशनिंग कार्डवर प्रत्येकाला शासनाननुसार मिळणाऱ्या हक्काचा शिधात तफावत असून प्रत्येकी ५ किलो शिधा न देता ४ किलो शिधा दिला जात असून आम्हाला हक्काचा शिधा सरकार का देत नाही? असा प्रश्न उपस्थित केला. शिधावाटप (रेशनिंग) दुकान क्रमांक ३९ फ १६७। क ९०७ संगितावाडी डोंबिवली पूर्व येथे गेल्या काही वर्षापासून आमची फसवणूक करुन आमचे हक्काचे धान्य का देत नाही.

याबाबत आम्ही महिलांनी रेशनिंग दुकानदाराला विचारणा केली असता दुकानदार आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देत आहे. अंत्योदय अन्न योजना अंतर्गत गोरगरीबांना देण्यात येणारे धान्य नाही देणार अशा पध्दतीने अरेरावीची भाषा दुकानदार आम्हा गरीब लोकांवर करीत आहे. राज्य शासनाकडून आम्हाला प्रत्येकाला व्यक्तीला ५ किलो धान्य आहे. दुकानदार आम्हाला ४ किलो धान्य देत आहे. दिलेल्या धान्याची कोणतीही पोचपावती देत नाही. एका घरात अंदाजे ४ सदस्यांची संख्या आहे. २००४ मध्ये ८०० सदस्यांची संख्या आणि ८०० किलो धान्याची दुकानदार चोरी करीत आहे, असा आरोप येथील राहिवाशांनी केला आहे. या दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि क्रांतीनगर रहिवाशांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळवून द्यावे. येत्या २७ जानेवारी २०२५ पर्यंत आमचे हक्काचे धान्य आणि दिलेल्या धान्याची पोचपावती मिळाली नाही तर २८ जानेवारी रोजी रेशनिंग कार्यालय येथे जन आंदोलन करु, असा इशारा येथील राहिवाशांनी डोंबिवली पूर्वेकडील शिधावाटप कार्यालय प्रमुख डोळस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब डोंबिवली (रामनगर), कल्याण तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

क्रांतीनगर  झोपडपट्टीतील रहिवाशांचे निवेदन मिळाले आहे. त्यांच्या तक्रारीवरुन २१ जानेवारी रोजी सदर रेशनिंग दुकानात जाऊन तपासणी केली जाईल. नियमानुसार नागरिकांना शिधा दिला नाही असे तपासात उघड झाल्यास त्या दुकानदाराविरुध्द कारवाई केली जाईल.
-दीपक डोळस, शिधावाटप अधिकारी, डोंबिवली पूर्व. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दुर्मिळ मांजऱ्या सापाला जीवनदान