एमआयडीसीच्या अपुऱ्या पाण्यामुळे नवी मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट

नवी मुंबई-:एमआयडीसीकडून नवी मुंबईत काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने त्या भागात सुरळीत पाणी पुरवठा व्हावा म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील इतर भागात होणाऱ्या २४ तास सुरू असणाऱ्या पाणी पुरवठयात कपात केली असून रोज सहा तास पाणी बंद ठेवले जात आहे.

नवी मुंबई शहरात मोरबे धरणाचा २४ पाणी पुरवठा  होत असला तर कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या भागात अजूनही एमआयडीसीचा  पाणी पुरवठा केला जात आहे.मात्र मागील काही महिन्यांपासुन या भागात एमआयडीसी मार्फत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांच्या तक्रारी येत होत्या.यावर मनपाने एमआयडीसी सोबत पत्रव्यवहार करून देखील कुठलीच सुधारणा झाली नाही.त्यामुळे या भागात सुरळीत पाणी पुरवठा रहावा म्हणून महापालिकेने इतर मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील २४तास पाणी पुरवठा असणाऱ्या भागात  पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला असून  सकाळी ८ ते १२  चार तास व  संध्याकाळी ८ ते १० दोन तसा दिवसातुन सहा तास पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे परिपत्रक शहर अभियंता यांनी नुकतेच काढले  आहे.त्यामुळे, बेलापूर, नेरुळ,तुर्भे व  वाशी विभागात ही पाणी कपात करण्यात आली आहे.

Read Previous

मराठा आराक्षण रद्द केल्याने मराठा समाज आक्रमक

Read Next

नवी मुंबई महानगरपालिकेने पूरग्रस्त भागात केलेल्या मदतकार्याची चिपळूणकरांनी आभार मानत केली प्रशंसा