नवी मुंबई महानगर पालीका हद्दीतील  शाळांनी मनमानी कारभार सुरू ठेवल्याप्रकरणी बैठक

वाशी, नवी मुंबई-:नवी मुंबई महानगर पालीका हद्दीतील  शाळांनी मनमानी कारभार सुरू ठेवल्याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून या शाळांची  मान्यता रद्द करण्याबाबत मनपाने शिक्षण उपसंचालक यांच्या कडे शिफारस केली होती. त्यावर शाळांची मान्यता /ना हरकत दाखला रद्द करण्यासाठी  शासनाने समिती गठीत केली होती. आणि या समितीने गुरुवारी वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहत पालकांची मते जाणून घेतली. आणि याचा अहवाल वरिष्ठांना दिल्यानंतर या शाळांबाबत शासन काय घेणार हे समजणार आहे,

 शाळेची फी न भरल्यामुळे  विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या तसेच फीवसुलीसाठी थेट वकिलामार्फत पालकांना नोटीस बजावणाऱ्या नवी मुंबईतील रायन इंटरनॅशनल स्कूल- सानपाडासह ,न्यू होरायझन पब्लिक स्कूल-ऐरोली,  ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल- कोपरखैरणे, सेंट लॉरेन्स स्कूल-वाशी, अमृता विद्यालय- जुईनगर नेरुळ  या ५ शाळांपैकी चार शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच एका शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी मुंबई शिक्षण उपसंचालकांकडे २६जून रोजी केली होती.

या ५ शाळांच्या विरोधात मुंबई येथे  शिक्षण उपसंचालकांच्या दालनात २९जुलै रोजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. शिक्षणमंत्र्यांच्या निर्देशानुसार याबाबतचा निर्णय घेण्यासाठी ठाणे जि.परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी संतोष भोसले यांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन व पालकांची  मते जाणून घेवून अहवाल तयार करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी (माध्यमिक विभाग)राजेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे सदस्य सचिव नवी मुंबई मनपा शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी जयदीप पवार ,सदस्या-ललिता कावडे(प्र.उपशिक्षण अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक जि. प.ठाणे),सदस्य-पी. एन.पाटील(सेवानिवृत्त विस्तार अधिकारी-शिक्षण तज्ञ) आणि सदस्य-पंकज चव्हाण(जनसंपर्क अधिकारी जि. परिषद ठाणे) यांच्या समितीने ४ ऑगस्ट रोजी सदर शाळांचा अहवाल जाणून घेतला  आणि ५ ऑगस्ट रोजी वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात सदर शाळेतील पालकांची मते आणि माहिती जाणून घेतली ज्यात सुमारे ९० हून अधिक पालकांनी या समितीसमोर आपली मते मांडली.  

चौकट- या समितीने तुमच्या पाल्याचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे का? निकाल देण्यात आलेला आहे का? पाल्याला पुढील वर्गात प्रमोट करण्यात आले आहे का? याबाबत विचारणा केली.त्यात काही पालकांच्या पाल्यांना सदर समिती चौकशीला येण्याच्या पार्श्वभूमीवर नुकतेच ऑनलाईन शिक्षणात सामावून घेतले असले तरी पुन्हा संपूर्ण फी भरण्याचा तगादा पालकांच्या मागे लावल्याची तक्रार पालकांनी केली आहे. वाशीच्या सेंट लॉरेन्स शाळेने एकल पालक असलेल्या संध्या म्हात्रे यांच्या मुलाचा  तिसरी आणि चौथीचा निकाल अद्याप दिलेला नाही. त्यांनी सध्या नोकरी नसतानाही शाळेची अर्धी फी भरण्याची तयारी दर्शवली आहे मात्र शाळा व्यवस्थापन पूर्ण फी वर अडून बसले आहे.काही पालकांनी शाळा पूर्ववत सुरु होवू द्या आम्ही शाळेची पूर्ण फी भरण्यास तयार आहोत मात्र ज्या सोयीसुविधा आम्ही वापरत नाही त्याचे शुल्क आम्ही भरणार नाही अशी भूमिका मांडली.   

Read Previous

मराठा आराक्षण रद्द केल्याने मराठा समाज आक्रमक

Read Next

10 हजाराहून अधिक पोटँशिअल सुपरस्प्रेडर्सनी घेतला कोव्हीड लसीकरणाचा लाभ