१५ ऑगस्टनंतर अनोंदीत कामगारांना एपीएमसीत प्रवेश बंद ?
नवी मुंबई-; एपीएमसी फळ आणि भाजीपाला बाजार आवारात अनोंदीत कामगारांनी १५ ऑगस्ट पर्यंत नोंद करून काम करावे अन्यथा १५ ऑगस्ट नंतर या अनोंदीत कामगारांना बाजार आवारात प्रवेश दिला जाणार नाही. असा निर्णय
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशी माहिती माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिली.
अनोंदीत कामगारांना याआधी दि. २७ जुलै २०२१ पासून भाजीपाला व फळमार्केटमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला होता. मात्र अचानक घोषित केलेल्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांनी आमचे नुकसान होईल,कामाचा खोळंबा होईल असे गाऱ्हाणे मांडत लवकरच आनोंदीत कामगारांची नोंद करून घेऊ, अशी भूमिका मांडली त्यामुळे तूर्तास हा निर्णय स्थगित ठेवण्यात आलेला होता. मात्र नुकतेच भाजीपाला बाजार घटक, माथाडी नेते, एपीएमसी संचालक, सभापती यांची याबाबत बैठक घेण्यात आली . या बैठकीत लवकरात लवकर आनोंदीत कामगारांनी नोंदणी करून घ्यावी असा निर्णय घेतला. एपीएमसी विशेषतः भाजीपाला आणि फळ बाजारात आनोंदीत कामगार समस्या अधिक आहे. ६००-८०० नोंदणीकृत कामगार असतील तर त्याच्या तिपटीने आनोंदीत कामगार काम करत आहेत. हे बेकायदेशीररित्या माथाडीची कामे करीत आहेत. त्यामुळे माथाडी कायद्याची पायमल्ली होत आहे. नोंदणीकृत कामगारांना महिन्याचा पगार माथाडी बोर्डातून दिला जातो,तर आनोंदीत कामगार हे कमी पैशात काम करतात आणि त्यांना कामाचा मोबदला दररोज रोकड स्वरूपात दिला जातो.