हस्तांतरणाच्या वाटाघाटीत सायन पनवेल महामार्ग अंधाराच्या गर्देत
नवी मुंबई-:भरधाव वेगसाठी प्रसिद्धअसलेल्या सायन पनवेल महामार्गावरील पथदिवे मागील दीड ते दोन वर्ष बंद असल्याने या पथदिव्यांची सध्या पुरती दुरावस्था झाली असून या मार्गावर रात्रीच्या वेळी अंधार पसरलेला असतो .त्यामुळे पावसाली दिवसात सदर रस्त्यावर अपघाताची शक्यता बळावली असुन मार्गावरील दिवाबत्ती व्यवस्था पूर्ववत सुरु करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भरधाव वेगासाठी प्रसिद्ध व मुंबई आणि पुण्याला जोडणारा एक महत्वाचा रस्ता असलेला सायन पनवेल महामार्ग पावसाला आला की खड्ड्यांसाठी प्रसिध्द होत असे मात्र मागील वर्षी या रस्त्या ८० कोटी खर्च करून काँक्रीटकरणाचे काम केल्यानंतर सदर मार्ग गुळगुळीत करण्यात आला आहे. मात्र रस्ता जरी गुळगुलीत झाला तरी या रस्त्यावरील दिवाबत्तीची समस्या जैसे थे वैसेच आहे.वाशी टोलनाका ते सीबीडी पर्यतचा रस्ता हा नवी मुंबई महापालिका हद्दीत मोडतो.
त्यामुळे हा रस्ता जरी खड्डे मुक्त झाला असला तरी या रस्त्यावरील पथदिवे मागील दीड ते दोन वर्षापासून बंद असल्याने सुसज्ज असा रस्ता अंधारात आहे.त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.या रस्त्यावरील पथदिवे नवी मुंबई महानगर पालिकेने ताब्यात घ्यावेत म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने मागणी केली आहे.मात्र नवी मुंबई महानगर पालिकेला या रस्त्यावरील जाहीरात मालकी हक्क हवा आहे.त्यामुळे हा तिढा न सुटल्याने या रस्त्यावरील पथदिव्यांचा व महामार्ग हस्तांतरणाचा प्रश्न तसाच आहे.त्यामुळे अशा पावसाली दिवसात दिवाबत्ती अभावी वाहन चालकांना वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे. त्यामुळे या मार्गावरील दिवाबत्तीची व्यवस्था तात्काळ करावी अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.याबाबत सायन पनवेल महामार्ग चे सहाय्यक अभियंता ओमप्रकाश परदेशी यांच्या सोबत संपर्क साधला असता प्रतिसाद भेटला नाही.