खाजगी दवाखान्यातील कोविड उपचाराची माहिती मनपाकडे असावी-संजय पवार

खाजगी दवाखान्यातील कोविड उपचाराची माहिती मनपाकडे असावी - संजय पवार

वाशी,नवी मुंबई-:नवी मुंबई शहरात एकीकडे कोविड रुग्ण कमी होत असताना दुसरीकडे कोविड आजारामुळे उपचार घेत असलेल्या मनपा सहित खाजगी रुग्णालयात मृत्यू संख्या वाढत आहे.त्यामुळे  अशा खाजगी रुग्णालयात करण्यात येणाऱ्या उपचाराबाबतात  महापालिकेकडे माहिती असावी अशी  मागणी भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी चे प्रदेश सचिव संजय पवार यांचा कडून नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबई महापालिका ने वाढत जाणाऱ्या कोविड रुग्ण संख्येच्या साठी नवी मुंबई मधील काही छोट्या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्या होत्या , व अश्या तर्हेचे हॉस्पिटल नवी मुंबई मध्ये अनेक ठिकाणी कार्यरत असून अत्यावश्यक वेळेत मध्ये हे हॉस्पिटल जनतेच्या उपयोगी पडत आहेत ,मात्र पालिकेने आपत्कालीन स्थितीत नव्याने परवानगी दिलेल्या काही रुग्णालयात उपचाराच्या दर्जाबाबत माहिती पालिकेकडे असावी कारण अनेक लहान रुग्णालयात मृत्यू घडत असल्याचे आढळून येत आहे , त्या करिता पालिकेने त्या ठिकाणी नोडल ऑफिसर नेमावेत किंवा त्या ठिकाणी पालिकेच्या नियुक्तीने वैद्यकिय तज्ञ ची नेमणूक करण्यात यावी त्या मुळे नवी मुंबई मध्ये दिवसोदिवस नवीन रुग्ण संख्या ची घट होत असताना  होणाऱ्या मृत्यूची कारणे देखील जनतेच्या समोर येतील अशी मागणी भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी चे प्रदेश सचिव संजय पवार यांचा कडून नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांचा कडे करण्यात आली.

Read Previous

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

Read Next

महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन