सार्वजनिक ग्रंथालयाच्या दशकपूर्ती सोहळ्यात मान्यवरांची भाषणे
वाढत्या नागरीकरणामुळे घणसोलीत वीजेवर ताण
नवी मुंबई-:घणसोली विभागातील घणसोली व गोठीवली गावात मागील काही महिन्यापासून बेसुमार अनधिकृत बांधकामे वाढत असून विजेची मागणी वाढत आहे.त्याममुळे मागणी अधिक पुरवठा कमी पडत असल्याने या भागात विजेवर ताण पडून विज जाण्याच्या प्रकारात वाढ होत चालली आहे.त्यामूळे या भागात अतिरिक्त वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
घणसोली विभागातील घणसोली व गोठवली गावात मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वीज जाण्याच्या घटना घडत चालल्या आहेत. त्यामुळे येथील नागरीकांना नाहक त्रास होऊन मुलांच्या ऑनलाइन शिक्षणावर देखील त्याचा परिणाम होत आहे. या भागात गेल्या दोन तीन वर्षापासून बेसुमार अनधिकृत बांधकामे वाढत आहेत.त्यामुळे हा विभाग अनधिकृत बांधकामांचे माहेर घर बनत चालले आहे. महापालिका ,सिडको अधिकारी यांचा येथील भुमाफियांना आशीर्वाद असल्याने ही बांध आणि त्यामुळे या परिसरात झलाट्याने नागरीकरण वाढले गेले.आणि वाढत्या बांधकामांसोबत या भागात झपाट्याने नागरीकरण वाढत असून त्याचा परिणाम देखील नागरी सुविधांर पडत आहे. घरे वाढल्याने या ठीकाणी विजेची मागणी प्रचंड वाढत चालली आहे. तर दुसरी कडे वाढती विजचोरी रोखण्यासाठी महावितरण तर्फे मागेल त्याला वीज जोडणी दिली जाते.मात्र वाढती विजेची मागणी आणि मर्यादीत वीज पुरवठा याचा ताळमेळ जुळत नसल्याने या भागात विजेवर ताण येऊन वारंवार वीज जाण्याच्या घटनांत वाढ होत चालली आहे.त्यामुळे या भागात अतिरिक्त विजेचा पुरवठा करण्याची व्यवस्था महावितरण ने करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
-----------------------------------------------
घणसोली भागात वाढत्या बांधकामांमुळे झपाट्याने नागरीकरणं वाढत आहे. त्यामुळे विजेचा वापर देखील तितकाच वाढला आहे. मात्र मागणी अधिक आणि पुरवठा मर्यादित असल्याने विजेवर ताण येऊन विजवाहीन्यांत शॉर्ट सर्किट होऊन वीज जाण्याच्या घटना वाढत आहेत.त्यामुळे याभागात अतिरिक्त वीज पुरवठा होईल अशी व्यवस्था महावितरण ने करावी.
मोनीष पाटील,
समाजिक कार्यकर्ते, घणसोली गाव