सार्वजनिक ग्रंथालयाच्या दशकपूर्ती सोहळ्यात मान्यवरांची भाषणे
कांदा बटाटा बाजारात पाणी भरण्याचे सत्र सुरूच
एपीएमसी बाजार आवारातील नालेसफाईचा दावा फोल
नवी मुंबई-:वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा बाजार आवारात नालेसफाई योग्य रीतीने न केल्याने आज बाजार आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे.त्यामुळे प्रशासनाने केलेला नाले सफाईचा दावा पुरता फोल ठरल्याचे दिसून येत असून एपीएमसी मधील गटारसफाईची पोलखोल झाली असल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडुन होत आहे.
नवी मुंबईत जोरदार पावासाने शहरात पाणी भरले असून त्यातून एपीएमसी बाजार समितीचे देखील वाचली नसून कांदा बटाटा बाजार आवरात मोठया प्रमाणात पाणी भरले होते. एपीएमसी द्वारे बाजार आवारात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामा साठी १२ लाखांचा ठेका दिला जातो त्यात चार महिने नाल्याची देखभाल देखील समावेश आहे. मात्र ठेकेदारा मार्फत एपीएमसी बाजार आवारातील मान्सूनपूर्व नालेसफाई योग्यरीत्या न केल्याने बाजार आवरात पहिल्याच पावसात पाणी भरून नालेसफाईच्या कामाची पोलखोल झाली होती. यावर
तर एपीएमसी बाजारालगत असलेल्या नाल्यात भरतीचे पाणी असल्याने जो पर्यत या नाल्यातील पाणी कमी होत नाही तोवर बाजार आवारातील पाण्याचा निचरा होत नसल्याने बाजार आवारात पाणी भरत असल्याचा दावा प्रशासनाकडून स्वच्छता निरीक्षक किरण घोलप यांच्या वतीने मागील महिन्यात करून वेळ मारून घेतली होती.मात्र प्रत्यक्षात कांदा बटाटा बाजार आवारातील नालेसफाई योग्य न केल्याने बाजार आवारात आज देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे स्वतः चे अपयश झाकण्यासाठी एपीएमसी प्रशासन खाडीच्या भरतीची ढाल पुढे करत आहे.असा आरोप आता कांदा बटाटा बाजार आवारातील व्यापारी करू लागले आहेत.