खारघर सेक्टर 5 मधील धबधब्यावर अडकलेल्या 116 पर्यटकांची सुटका

खारघर :खारघर सेक्टर पाच सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालय लगत असलेल्या धबधब्यावर अडकलेल्या 116 पर्यटकांची खारघर अग्निशमन जवानांनी सुखरूप सुटका केली.

  रविवार सकाळ पासून रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे शेकडो पर्यटकांनी खारघर मधील धबधबावर आनंद घेत होते. खारघर सेक्टर पाच मधील धबधब्यावर काही पर्यटक अडकल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी ह्यांना मिळाल्यावर त्यांनी तात्काळ खारघर अग्निशमन केंद्राला माहिती दिली.खारघर अग्निशमन केंद्राचे अधिकारी प्रवीण बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन जवानांनी दुथडी  भरून जाणाऱ्या नाल्यावर पन्नास फूट लांब सीडी आणि दोर खंड बांधून सर्व पर्यटकांची सुटका केली.त्यात 78 महिला 5 मुले होती.

    शत्रुघ्न माळी म्हणाले खारघर मधील धबधब्यावर प्रवेश बंद  असल्याची माहिती  फलक, सोशल मिडीया, वर्तमानपत्रात जनजागृती करूनही  नागरिक पोलिसाची नजर  चुकवुन  आड मार्गाने खारघर डोंगरात जातात आणि स्वताच जीव धोक्यात घालतात. नागरिकांनी स्वताच जीव धोक्यात घालू नये असे आवाहन  माळी यांनी केले आहे.

Read Previous

 ‘लवाद’च्या निर्णयाला उच्च न्यायालयाची अंशत: स्थगिती

Read Next

कोव्हीड अर्थसहाय्य मिळण्यासाठी अटी-शर्ती शिथिल करण्याची मागणी