वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेची मुजोरी कायम 

पालकांनी दिला सामूहिक आत्मदहनाचा इशारा 

नवी मुंबई-:दोन महिन्याची फी भरली नाही म्हणून दहाविच्या विद्यार्थी नीला तिचा आसन क्रमन न दिल्याने तिचा निकाल रखडला आहे.याबत पालकांनी शाळेत जाउन विचारणा केली असता आधी फी भरा त्यानंतरच आसन क्रमांक दिला जाईल असे आडमुठे  धोरण अवलंबवले आहे.त्यामुळे शाळेच्या या मुजोरी पुढे पालक हतबल  झाले असून दोन दिवसात संपूर्ण कुटुंब शाळेसमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा पालक शरद पाटील यांनी दिला आहे.

 फी साठी अडवणूक करणे,ऑनलाइन वर्गातून बाहेर काढणे तसेच निकाल राखुन ठेवणे आदी तक्रारी विरोधात नवी मुंबई मनपा आयुक्तांनी शहरातील ५ मुजोर शाळांची मान्यता रद्द करण्याची शिफारस शिक्षण उपसंकलकांना केली आहे. तर शिक्षज अधिकारी यांनी देखील अशा शाळांवर कारवाई  करण्याचा इशारा दिला आहे.तसेच या शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचाकांनी तयार करून देखील या साऱ्या कारवाईच्या इशाऱ्यांना केराची टोपली दाखवत शाळांनी आपली मुजोरी कायम ठेवली आहे.आणि मान्यता रद्द करण्याच्या यादीत वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेचा नाव असुज देखिल या शाळेने आपला आडमुठेपणा कायम ठेवत पालकांची अडवणूक कायम ठेवली आहे.

 शुक्रवार दिनांक १६ जुलै रोजी दहावीचा निकाल होता.मात्र वाशी येथील सेंट लॉरेन्स या शाळेतील विद्यार्थिनी तनिशा शरद पाटील हिला डोम महिन्याची फी भरली नाही म्हणून शाळेने आसन क्रमांक दिला नाही.त्यामुळे तिला दहावीचा निकाल लागल्यावर निकाल तपासत असताना तिचा निकाल मात्र मिळाला नसल्याचे निदर्शनास आले नाही .याबाबत जाब।विचारण्यासाठी  शनिवारी पालक शाळेत  गेले या असता आधी फी भरा त्या नंतरच आसन क्रमांक दिला जाईल.असे आडमुठे धोरण अवलंबून पालकांना वेठीस धरून ठेवले. तर आपला निकाल दिसला नाही म्हणून तनिशा पाटील ही प्रचंड मानसिक तणावाखाली गेली आहे. त्यामुळे या प्रकाराने जर आमच्या मुलीचे काही बरे वाईट झाले तर त्यास शाळा प्रशासन जबाबदार राहणार असून दोन दिवसात जर  शाळेने आसन क्रमांक नाही दिला तर शाळेसमोरच संपूर्ण कुटुंबाला घेऊन आत्मदहन करणार असल्याचा इशारा शरद पाटील यांनी दिला आहे.

Read Previous

मराठा आराक्षण रद्द केल्याने मराठा समाज आक्रमक

Read Next

जीवघेणा मॅन होल ; एनएमआयएमएस महाविद्यालय शेजारी रस्त्याच्या कडेला मॅन होल