‘भाजपा'च्या ‘महा विजय'चा महा जल्लोष

विजयाच्या घोषणांनी आसमंत गेला दणाणून

नवी मुंबई : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मधील विधानसभा निवडणुकांमध्ये ‘भाजपा'ने मिळवलेल्या महाविजयाचा महा जल्लोष ‘नवी मुंबई भाजपा'च्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला.

नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली महा जल्लोष साजरा झाला. माजी खासदार संजीव नाईक, ‘भाजपा आयटी सेल'चे प्रमुख सतीश निकम, महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती संपत शेवाळे, नवीन गवते, ‘नवी मुंबई भाजपा महिला मोर्चा'च्या अध्यक्षा माधुरी सुतार, ‘युवा मोर्चा'चे अध्यक्ष अमित मेढकर, ‘उत्तर भारतीय मोर्चा'चे अध्यक्ष राजेश राय, लोकसभा विस्तारक अरुण पडते, माजी नगरसेवक शशिकांत राऊत, लीलाधर नाईक, प्रकाश मोरे, अंजली वाळुंज, सुरेश शेट्टी, वैशाली नाईक, उषा भोईर,
शुभांगी पाटील, शशिकला पाटील, ॲड. भारती पाटील, रविकांत पाटील, सायली शिंदे, राजेश शिंदे, कृष्णा पाटील यांच्यासह ‘भाजपा'चे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जल्लोषात सहभागी झाले होते.

 यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘भारतीय जनता पार्टी'च्या विजयाच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. वंदे मातरम्‌ आणि भारत माता की जय तसेच जय श्रीरामच्या घोषणा  दुमदुमल्या. मिठाई एकमेकांना वाटून विजयाचा आनंद गोड करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी वाद्यांच्या तालावर ठेका धरतआपला आनंद व्यक्त केला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आ. प्रशांत ठाकूर दाम्पत्याचा अवयव दान संकल्प!