मनपा आयुक्तांच्या आवाहनाला विकासकांनी फासली हरताळ?

नवी मुंबई मनसेची  सिडको प्रदर्शन केंद्रावर धडक

नवी मुंबई -: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व दुकाने व आस्थापना यांनी प्रत्येक आस्थापनेचा नामफलक तात्काळ मराठी देवनागरी भाषेत करावा असे आवाहन नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले होते. मात्र सदर आवाहन करून देखील वाशीत विकासकांनी भरवलेल्या मालमत्ता प्रदर्शनात कुठल्याही दालनात मराठी फलक लावले गेले नाहीत.त्यामुळे येथील विकासकांनी मनपा आयुक्तांच्या आवाहनालाच  हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२च्या कलम ३६ ‘क’ (१) च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला कलम ७ नुसार दुकानांवर मराठी भाषेतून ठळक अक्षरांत नामफलक लावणे बंधनकारक आहे.यावर सर्वोच्च. न्यायालयाने  निर्देश देत राज्यातील सर्व आस्थापना/दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी २५ नोव्हेंबर  पर्यंत दिलेली मुदत संपली  आहे. या पार्श्‍वभूमीवर दुकानांवर देवनागरी लिपीत ठळक मराठीत पाटी नसल्यास न्यायालयाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिकेकडून मराठीत पाट्या लावण्यासाठी आयुक्तांनी आवाहन केले होते.मात्र असे आवाहन करून देखील नवी मुंबईतील विकासकांनी या आवाहनाला हरताळ फासली आहे. वाशीतील सिडको प्रदर्षनी केंद्रात नवी मुंबईतील विकासकांनी मालमत्ता प्रदर्शन भरवले आहे. मात्र या ठिकाणी कुठल्याही दालनात मराठी पाटी नसून सर्व नावे इंग्रजीत आहेत. त्यामुळे या विकासकांवर मनपा काय कारवाई करणार ?असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२च्या कलम ३६ ‘क’ (१) च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला कलम ७ नुसार दुकानांवर मराठी भाषेतून ठळक अक्षरांत नामफलक लावणे बंधनकारक आहे.

प्रदर्शन केंद्रावर मनसेची धडक

महाराष्ट्र राज्यात सर्व दुकानांवर मराठी पाट्या  लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने  निर्देश दीले होते.त्यानुसार मनसेनेही आंदोलने करत मराठी पाट्या लावण्या बाबत मागणी केली होती.असे असताना देखील वाशीतील सिडको प्रदर्षनी केंद्रात नवी मुंबईतील विकासकांनी मालमत्ता प्रदर्शनात मराठी पाट्याना बगल दिली आहे.याववर नवी मुंबई मनसेने सिडको प्रदर्शन केंद्रात धडक देत आंदोलन केले. व जोवर सर्व फलक मराठीत करत नाही प्रदर्शन केंद्र  सरू ठेवणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘मनसे'चा दणका!