आर.टी.ई. प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

 ठाणे :  आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२ ला मुदतवाढ़ देण्यात आली असून पालकांनी बालकांचे प्रवेश दिनांक २३ जुलै २०२१ पर्यंत निश्चित करायचे आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये तसेच सर्व शासकीय नियमांचे पालन करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) संतोष भोसले यांनी केले आहे. 

वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इ 1 ली ते 8वी पर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी शासनाकडून दरवर्षी  या घटकातील बालकांसाठी 25 टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते . 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया  सन २०२१-२२ साठी  ठाणे जिल्हयातील पाच तालुके व सहा मनपातील आर.टी.ई. 25% प्रवेशासाठी  दिनांक ०७/०४/२०२१  रोजी लॉटरी  ची  प्रक्रीया राज्यस्तरावरून  पुर्ण करण्यात आली असुन सदर लॉटरी मध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण ९०८८ अर्जांची निवड झाली आहे . निवड झालेल्या बालकांना संबधित शाळेकडून  पालकांना SMS द्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जाईल, परंतू पालकांनी फक्त SMS वर अवलंबून राहू नये.  आर.टी.ई.पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा व दिनांक २३/०७/२०२१ पर्यंत प्रवेशाबाबत कार्यवाही करावी. 

पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a) प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
b) आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि लॉटमेंट लेटर (Allotment Letter ) ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.

Read Previous

‘जुन्नर’चा केशर आंबा एपीएमसी फळ बाजारात दाखल

Read Next

ऐरोलीत मराठी भाषा भवन उपकेंद्राची उभारणी