पीएसए प्लान्ट आणि एचआरसीटी मशीनचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

         तिस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य सुविधांमध्ये पिडीयाट्रिक सुविधांसह आवश्यक वाढ केली जात असून कोरोनाबाधित रुग्णांवर जलद उपचार होण्यासाठी कोव्हीड सेंटरमध्येच एचआरसीटी स्कॅनींग मशीनची व्यवस्था केल्याने उपचार वेळेत होऊन रुग्ण बरा होण्यासाठी याचा फार फायदा होईल असे सांगत महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी वाशी येथील रुग्णालयात उभारण्यात आलेल्या 960 लीटर प्रती मिनिट क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचे काम केल्याबद्दल महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर आणि सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

      नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी येथील कोव्हीड सेंटरमध्ये सीएसआर अंतर्गत महानगरपालिकेस प्राप्त एचआरसीटी डायग्नोस्टिक स्कॅनींग मशीनचे लोकार्पण तसेच सार्वजनिक रुग्णालय वाशी येथील 960 एलपीएम क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे (PSA) लोकार्पण याप्रसंगी पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे या दोन्ही उल्लेखनीय प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी मंत्री महोदयांसमवेत ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री. राजन विचारे, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर तसेच अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, व श्रीम. सुजाता ढोले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

      यावेळी मंत्रीमहोदयांच्या शुभहस्ते आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त कोव्हीड विरोधातील लढ्याच समर्पित भावनेने अथक सेवाकार्य करणा-या डॉक्टरांचा प्रतिकात्मक सन्मान म्हणून सिडको कोव्हीड सेंटरमधील डॉ. शिवानी मिश्रा यांना सन्मानीत करण्यात आले. 

 

कोव्हीड सेंटरमध्येच एचआरसीटी सुविधा उपलब्ध करून देणारी नवी मुंबई पहिली महानगरपालिका

 

      देशातील सर्वोत्तम कोव्हीड सेंटरमध्ये गणल्या जाणा-या नवी मुंबई    महानगरपालिकेच्या सिडको एक्झिबिशन सेंटर येथील कोव्हीड सेंटर मध्ये कोव्हीडच्या दुस-या लाटेमध्ये दैनंदिन 1100 हून अधिक रूग्ण उपचार घेत होते. त्यापैकी काही रूग्णांचे एचआरसीटी स्कॅनींग करण्यासाठी त्यांना       वाशी येथील नमुंमपा सार्वजनिक रूग्णालयात न्यावे लागत होते. यामध्ये काही रूग्णांची प्रकृती अधिक खालावत असल्याचे निदर्शनास येत होते.

Read Previous

‘जुन्नर’चा केशर आंबा एपीएमसी फळ बाजारात दाखल

Read Next

बेलापूर विभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई