घणसोलीत अनधिकृत बांधकामांवर मनपाची तोडक कारवाई
नवी मुंबई-:नवी मुंबई शहरात वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी पाहता मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशात देण्यात आला होता.त्यापार्श्वभूमीवर मनपा अतिक्रमण विभाग कामाला लागले असून सर्वाधिक अनधिकृत बांधकामे असलेल्या घणसोली विभागात मागील एक महिन्यापासून कारवाईचे सत्र सुरू ठेवले असुन सोमवार दिनांक २८ जून रोजी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.यात घणसोली बाळाराम वाडी येथील सिडकोच्या जमिनीवरील २ अनाधिकृत बांधकामे हटविली ,यामध्ये चालू बांधकामाचे कॉलम ब्रेकर च्या मदतीने तोडण्यात आले तर जेसीबीच्या मदतीने दुसऱ्या बांधकामाचा चौथारा तोडण्यात आला आहे, तसेच घणसोली डी मार्ट समोरील सिडकोच्या भूखंडावर अनधिकृतपणे उभारलेल्या शॉप वर देखील तोडक कारवाई करण्यात आली .या अनाधिकृत बांधकामांना एम आर टी पी नोटीस बजावून देखील बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम सुरूच ठेवले होते. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यवसायिकावर गुन्हे दाखल करून अखेर महापालिकेच्या माध्यमातून तोडक कारवाई करण्यात आली असल्याची महिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.