सिडको घेराव आंदोलन करणाऱया आजी-माजी आमदार खासदरांसह 20 हजार आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल  

नवी मुंबई : विमानतळाच्या नामकरणासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या सिडको घेराव आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नसताना, तसेच मनाई आदेश लागू असताना प्रकल्पग्रस्तांनी घेराव आंदोलन करुन सुमारे 20 हजारांची गर्दी जमवली होती. करोनाची दुसरी लाट सुरु असताना, आंदोलनकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग न पाळता गर्दी करुन कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने एनआरआय पोलिसांनी या आंदोलनाचे आयोजक, आजी-माजी आमदार, खासदार तसेच आंदोलनात सहभागी झालेले सुमारे 18 ते 20 हजार आंदोलनकर्त्यांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.  

लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय समितीने 24 जुन रोजी सिडको भवन येथे घेराव घालुन तीव्र आंदोलन करण्याचे जाहिर केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या वतीने आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागु करण्यात आला होता. त्यामुळे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पोलिसांनी हद्दीतील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना आंदोलन न करण्याबाबत समजावले होते. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकित विमानतळ नामकरणावर कुठलाही तोडगा न निघाल्याने कृती समितीने सिडको भवनवर घेराव आंदोलन घेण्याचे निश्चित केले. त्यामुळे पोलिसांनी कृती समितीच्या प्रमुख पदाधिकारी व् कार्यकर्त्यांवर कलम 149 नुसार प्रतिबंधात्मक नोटीसा देखील बजावून त्यांना आंदोलन न करण्याबाबत सुचित केले होते. 

मात्र त्यानंतर देखील लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने गुरुवारी सिडको घेराव आंदोलन घेऊन सुमारे 20 हजारांची गर्दी जमविली. या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांनी सोशल डिस्टान्सिंग न पाळता तसेच मास्कचा वापर न करता. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे आयोजकांनी किल्ला सिग्नल ते एनआरआय कॉम्पलेक्स दरम्यानच्या रोडवरील विजेच्या खांबावर झाडावर मोठÎा प्रमाणात बॅनर व झेंडे लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केले.  

तसेच सभास्थळी व परिसरात मोठÎा प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, नाश्त्याचे रिकामे पाकीट, कागदी पत्रावळ्या टाकुन केर कचरा केला. तसेच आंदोलनाच्या ठिकाणी विनापरवाना ड्रोनद्वारे शुटींग केल्याचा ठपका आयोजक व आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार एनआरआय पोलिसांनी या आंदोलनाच्या आयोजकांसह आजी माजी आमदार,खासदर प्रमुख कार्यकर्ते अशा एकुण 18 ते 20 हजार आंदोलनकर्त्यांवर गुन्हा  दाखल केला आहे.  

 

Read Previous

 ‘लवाद’च्या निर्णयाला उच्च न्यायालयाची अंशत: स्थगिती

Read Next

नवी मुंबई विमानतळ आवारात अंतुलेंसह दि.बा.पाटील यांचे स्मारक उभारण्याची मागणी