कार्यकर्त्यांना फसवून राजेश भोर यांनी भाजप प्रवेश करवून घेतला ? 

नवी मुंबई : २२जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक जिल्ह्याध्यक्ष राजेश भोर यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता.मात्र सदर प्रवेशावेळी इतर कार्यकर्त्याना फसवुन त्यांचा भाजप प्रवेश करवून घेतला असा आरोप भोर यांच्यावर करत भाजप प्रवेशाची पोलखोल केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्ह्याध्यक्ष राजेश भोर यांनी २२ जून रोजी आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला. मात्र सदर प्रवेश करतेवेळी कार्यकर्त्याना नोकरी लावून देतो असे खोटे आमिष दाखवून बोलवुन घेत  मध्ये प्रवेश करवुन घेतला होता.आणि  यातील दोन कार्यकर्ते परत स्वगृही राष्ट्रवादीत परतले असून संतोष वाळके व योगिराज साबळे या  दोन कार्यकर्त्यानी अयोजित पत्रकार परिषदेत राजेश भोर यांच्यावर आरोप करत भाजप प्रवेशाची पोल खोल केली.तर राजेश भोर यांनी आमदार शशिकांत शिंदे व तेजस शिंदे यांच्या वागणूकिला कंटाळुन पक्ष सोडत असल्याचा आरोप  केला होता. वास्तविक मागील दोन वर्षापासून भोर यांची वर्तणूक चांगली नव्हती व याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर भोर यांना पदावरून हटवण्यात आले व संपूर्ण युवक कार्यकारणीच बरखास्त करण्यात आली होती.त्यामुळे भोर यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असून त्यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला खिंडार सोडा साधे एक छिद्र देखील पडले नाही असे मत राष्ट्रवादी युवक चे माजी जिल्हाउपाध्यक्ष नितीन चव्हाण यांनी सांगितले.यावेळी महाराष्ट्र चिटणीस गौतम आगा हे देखील उपस्थित होते.

राजेश भोर यांना मी जॉब हवा आहे म्हणून फोन केला तर त्यांनी मला  व्हाईट हाउस वर या जॉब लावून देतो असे सांगितले. मात्र तिथे गेल्यावर आमचा भाजप मध्ये प्रवेश करवुन घेतला. याबत आम्हीं तिथे ही भोर यांना सांगितले की हे बरोबर नाही.

संतोष वाळके, राष्ट्रवादी कार्यकर्ता

 

 

Read Previous

रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव 

Read Next

सिडको घेराव आंदोलन करणाऱया आजी-माजी आमदार खासदरांसह 20 हजार आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल