नवी मुंबई पालक संघर्ष कृती समिती शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट

नवी मुंबई -: नुकत्याच सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात शिक्षण संस्था शालेय शुल्क भरले नाही .म्हणून अचानक मुलांना ऑन लाईन वर्गातून बाहेर काढून शुल्क वसुलीसाठी तगादा लावत आहे.या मुद्द्यावर नवी मुंबई पालक संघर्ष कृती समितीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेवून याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली.या अनुषंगाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सविस्तर माहिती घेवून याबाबत ठोस पावले उचलू असे या शिष्टंडळाला स्पष्ट केले.

  नवी मुंबई पालक संघर्ष कृती समितीने मार्फत नवी मुंबई शहरातील शैक्षणिक संस्थांच्या शुल्क वसुली सक्ती विरोधात संघर्ष करत आहे.या अनुषंगाने विकास सोरटे,समीर बागवान,बाळासाहेब शिंदे,गणेश गायकवाड यांच्या शिष्टंडळाने राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून सविस्तर माहिती दिली.केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या शाळा व्यवस्थापन याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. न्यायालयातील याचिकेबाबत चर्चा करताना शासनाने व्यवस्थित बाजू मांडावी यासाठी निर्देश देण्याबाबत मागणी करण्यात आली.

यावेळी शासनाच्या ८ मे २०२० रोजी जारी केलेल्या आदेशाला शाळा संघटनेने न्यायालयात आव्हान दिले आहे.मात्र मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये याबाबत स्पष्ट निर्देश असल्याने शिक्षण विभागाला याबाबत आदेश द्यावे ही देखील मागणी करण्यात आली.राज्यपालांना सविस्तर निवेदन देण्यात आले.या निवेदनात मुख्य बाबी कडे लक्ष वेधण्यात आले. गत वर्षी शुल्क सवलत आणि वसुलीसाठी अध्यादेश जारी करण्यात आले होते.त्याच धर्तीवर शासनाने पुन्हा अध्यादेश काढावेत आणि फी वसुलीसाठी शिक्षण संस्थांनी सक्ती करु नये आणि फी भरण्यासाठी पुरेसा वेळ देत असताना फक्त ट्युशन फी घ्यावी ही आग्रही मागणी करण्यात आली.यावर लवकरच संबंधितांना आदेश देवू असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितले.

Read Previous

‘जुन्नर’चा केशर आंबा एपीएमसी फळ बाजारात दाखल

Read Next

आर्थिक हित जपण्यासाठीच पुनर्विकासाच्या कामात घातला जातोय खो?