योग भारताने जगाला दिलेली चिरंतन व अपूर्व देणगी... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील कायम प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी राष्ट्रसंघात योगदिनासबंधी एक ठराव दिला व तो १७७ राष्ट्रांनी संमत केला त्यानुसार ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासंधाने २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली. 

२१ जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. उत्तरायण संपून दक्षिणायन याच दिवशी सुरू होते. या काळात मिळणारी ऊर्जा सर्व प्राणिमात्रांना लाभदायक ठरते. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य व चिरंतन भेटच आहे  आज जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेदामध्येही, नारदीय सूक्त तसेच भग्वदगीतेमद्धेही अनेक वेळा योगाचे उल्लेख आहेत. महाभारताच्या शांतिपर्वामध्येही योगाचे उल्लेख आहेत. अगदी योगाचे मूळ दहा हजार वर्षार्पयंत मागे जाते. योगावर पतंजली मुनींनी इ स पूर्व १५० मध्ये योगसूत्र लिहीली आहेत. प्राचीन मोहंजोदाडो, हडप्पा संस्कृतीमध्ये योग असलेल्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. पूर्वी केवळ ऋषी मुनी यांच्यार्पयंत सीमित असलेला योग आज अगदी सामान्य लोकांनाही माहित होऊ लागला आहे. आज योगाचा प्रसार व प्रचार करण्याचे महत्वाचे काम गुरू बाबा रामदेव, बी के एस अय्यंगार  तसेच स्वामी शिवानंद यांनी गेली अनेक वर्षे केले आहे सर्वसामान्य लोकांना योग त्यांनीच परिचित करून दिला. गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात..योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. भावनात्मक समतोल आणि त्या अनादी व अनंत तत्वाला स्पर्श करत आध्यत्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे.  शरीर व मन यांचा अन्यन्यसाधारण संबंध आहे. मन जर आनंदी निरोगी असेल तरच शरीर व मन आनंदी असते. योग्य साधनेत ते साध्य केले जाते. योग हा शब्द संस्कृतच्या युज पासून तयार झाला आहे. युज याचा अर्थ जोडणे असा आहे. यंदाच्या योग दिनाचे घोषवाक्य आहे भ्दुी दिी ेंात्त् ंाग्हु.  गेली सुमारे एक वर्षाहून अधिक काळ सारे जग  कोरोना या विषाणूविरुध्द्व लढत आहे. भारतातही ते संकट कायम आहे. या मुदतीत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. आता तिसरी लाट केव्हा येईल त्याचा नेम नाही. कोरोनाला यशस्वीरित्या ताेंड द्यावयाचे असल्यास व आपली प्रतिकार शक्ती वाढवावयाची असल्यास योगासारखा दुसरा उपाय नाही. योगातील प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम तसेच भ्रस्तिका हे प्रकार निरोगी जीवनासाठी व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक आहेत. ध्यानात जाऊन मन एकाग्र करणे यातही समाधान मिळू शकते. मन स्थिर होते. योगाची आठ अंगे आहेत. त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा व समाधी होत. योगाच्या सानिध्यात माणसाला सुख व आनंदाची प्राप्ती होऊ शकते अनेक होतकरू योग शिकण्यासाठी भारतात येत आहेत, हीसुद्धा भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची व गौरवाची बाब आहे. 

आज काल अनेक शाळातून योगाचे धडे शिकविले जातात. पूर्वी आैंध या सातारा जिल्ह्यातील संस्थानामध्ये सूर्यनमस्कार व त्याचे महत्व  राजे भवानराव  पंतप्रतिनिधींनी गावागावात व अनेक शाळांत रुजविले होते. त्यांचे चिरंजीव व ब्रिटनचे माजी हायकमिशनर अप्पासाहेब पंत यानीही परदेशात याचा प्रचार केला होता. सूर्यनमस्कार हा सर्क्रिंगसुंदर व्यायाम आहे. आज अनेक ठिकाणी योगाची शिबिरे आयोजित केली जातात. योग ही केवळ एक दिवसात करावयाची बाब नाही, त्यात सातत्य हवे तरच त्याचे परिणाम दिसू लागतात. सध्याच्या धावपळीच्या व गतिमान युगात तसेच कोरोनासारख्या संसर्ग जन्य रोगाशी यशस्वीरीत्या सामना करावयाचा असल्यास योगाची साथ धरावी लागेल. शरीर व मन यांचा संबंध आनंदी व सकारात्मक ठेवावयाचा असल्यास योगाची मदत होते. दररोज योगसाठी काही वेळा राखून ठेवणे व तो नियमितपणे करणे हे केल्यासच त्याचे शारीरिक व मानसिक फायदे मिळू शकतात  तुम्ही युवक असा, कि वयोवृद्ध किंवा निरोगी असा, किंवा आजारी असा; योगाभ्यास सर्वासाठी लाभदायक आहे  व तो सर्वाना प्रगतीपथावर घऊन जातो. 

Read Previous

नव्या नियमांमुळे मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर कमी ट्रॅफिक

Read Next

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन - २६ जून