आयुष्य हीच एक जादू 

लहानपणी उकीरड्यावर सापडलेले जादुचे दहा प्रयोग हे पुस्तक घरी आणून वाचले अन्‌ त्या माध्यमातून पुस्तकातील दहा प्रयोग शिकून शाळेत सादर केली. आणि अवघ्या ९ व्या वर्षापासून जादूगार म्हणून नावारुपाला आलेले आणि तद्‌नंतर आतार्पयंत जादू कलेतील जवळपास ५० वर्षाचा कार्यकाल पूर्ण करुन आपल्या कौशल्य, कलेने नवी मुंबईची नाममुद्रा आंतरराष्ट्रीय जगतात उमटविली आहे असे विश्वविख्यात जादूगार, दृष्टीभ्रमकार सतिश देशमुख यांच्याशी ‘आपलं नवे शहर’चे उपसंपादक राजेंद्र घरत यांनी साधलेला संवाद.

सतिश देशमुख यांनी आजवर ८० देशात आपली कला सादर केली असून २८ हजार विद्याथ्र्यांना प्रशिक्षित केले आहे. विविध ठिकाणच्या पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्यासाठी जादूच्या माध्यमातून सहकार्य केलेले सतिश देशमुख रस्ता सुरक्षा अभियानचे ब्रॅन्ड ॲम्बेसिडर आहेत. याशिवाय त्यांनी अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये कलेच्या प्रसारासाठी व्याख्याने दिली असून विविध संस्थांनी देखील व्याख्यानासाठी निमंत्रित केल्याचे देशमुख यांनी संवादात सांगितले. तणावमुक्त जीवन जगण्याची कला सतिश देशमुख यांनी साध्य केली आहे. एकंदरीतच आजवरच्या अनुभवावरुन आयुष्य खूप सुंदर आहे, ते जगण्याची कला जमली पाहिजे, असे सतिश देशमुख स्पष्ट करतात.  

► पोलीस अधिकाऱ्याचे सुपुत्र...मग जादू कलेकडे कसे वळलात?
- वडील पोलीस अधिकारी असल्याने मी पोलीस अधिकारी बनावे, अशी त्यांची इच्छा होती. मी वडीलांच्या इच्छेखातर १९७७-७८ मध्ये पोलीस हवालदार म्हणून पोलीस खात्यात भरती झालो. नंतर १९८१ मध्ये पोलीस उपनिरीक्षक बनलो. मी परफॉर्मिंग आर्टस्‌मुळे जादुकडे वळलो गेलो. वास्तविक पाहता याअगोदर जादू हा विषय माझ्यासाठी वेगळा होता. तरीही जादू शिकताना मी सर्वप्रथम शिक्षणाला प्राधान्य दिले. मुंबईतून मी बी.एससी. पूर्ण केले आहे. परंतु, मी कधी जादुगार झालो अन्‌ जगात विविध ठिकाणी प्रयोग करत गेलो ते मला समजलेच नाही. आयुष्य हीच एक जादू आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करा; यश नक्कीच मिळेल, आज जादू या क्षेत्रात मी एक पॅशन म्हणून काम करतो.

वयाच्या ९व्या वर्षी सापडलेले पुस्तक आणि त्यानंतर तुम्ही बनलेले जादुगार याबद्दल...
- लहानपणी मला जादुबाबत काहीच माहिती नव्हती. साधारण नऊ वर्षाचा असताना वाटेत चालताना एका उकीरड्याच्या जागी मला एक जादुचे दहा प्रयोग नमूद असणारे पुस्तक सापडले. या पुस्तकाला घाणेरडा वास येत होता खरा;  पुस्तकातील साहित्य सामग्री (कन्टेन्ट) पूर्ण वाचून जादुचे १० प्रयोग मी शिकलो. नोट कशी गायब करायची ते शिकलो, ते शाळेच्या मुख्याध्यापकांना समजले. त्यांना मी ते प्रयोग करुन दाखविले आणि त्या दिवसापासून मी जादुगार झाल्याचे शाळकरी जीवनात जणू घोषित झाले. 
 

या क्षेत्रात काही अभ्यास/ मार्गदर्शन कसे?
- मला हळूहळू जादू या क्षेत्राची आवड वाटत गेली. मग मी या क्षेत्रातील जादुगारांचे विविध ठिकाणी जाऊन प्रयोग बघत गेलो. त्यातील लॉजिक समजण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला जादुतून विचार करण्याची शक्ती, प्रेरणा मिळत गेली. जादुमुळे विचारांना चालना देखील मिळते एवढे नक्की.

जादू ही कला की विज्ञान की मनोरंजनाचे साधन ?
- जादू ही शंभर टक्के कला आहेच. पण ते शास्त्र देखील आहे. त्यामुळे यात विज्ञानातील केमिस्ट्री, फिजिक्स आणि गणिताचा भाग येतोच, माझ्याकडील अनेक प्रयोग हे विज्ञानाधारित आहेत. 
 

जादुचा आयुष्यात उपयोग कशाप्रकारे होतो?
- आयुष्य हे सुंदरच आहे; पण ते जगण्याची कला असावीच;  जादुमध्ये व्यक्तीमत्व विकास, संभाषण कला, टायमिंग, गतिमानता, समयसुचकता, आदि बाबी महत्वाच्या असतात. या कलेमध्ये आपल्या शरीराची भाषा ७० टक्के बोलत असते. कलेमध्ये आपण रममाण होतो, तेव्हा शरीरात एक प्रकारे रसायनक्रिया निर्माण होते. जगात आजही वयाच्या ९५ व्या वर्षार्पयंत कला सादर केलेली व्यक्तीमत्व आहेत. त्यामुळे मी देखील आज वयाच्या ६२ व्या वर्षीही तणावमुक्तीचे जीवन जगत आहे. 

प्रयोग सादरीकरणावेळी होणाऱ्या चुका कशा दुरुस्त करता?
- जादुचे प्रयोग सादर करतेवेळी प्रेक्षकांना आता पुढे काय होणार ते माहितच नसते. त्यामुळे एखाद्या वेळेस प्रयोग फसला तरी त्यात सांभाळून घता येते. समजा जादूने दोन कबुतरे काढताना एकच कबूतर निघाले, दुसरे अडकले, पण प्रेक्षकांना हेहीे नवीन असते.
 

जादू कलेचा विस्तार भारतात की परदेशात जास्त होत गेला?
- माझ्या माहितीप्रमाणे मुंबईत जवळपास ५ हजार लहान-मोठे जादुगार आहेत. मुंबईत उच्चशिक्षित जादुगार असून ते जरी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिक असले तरीही ते जादुद्वारे पैसे कमावतात. वास्तविक पाहता जादू हा एक मोठा अभ्यास आहे. जगात या क्षेत्रात खूप संधी आहेत. जगात जादुवरील वेगवेगळ्या विषयांचे प्रशिक्षक, पुस्तके यामुळे संधी उपलब्ध आहेत. तसेच नजरबंदी, रेकी, हिप्नॉटिझम, कला, आदि कला वेगवेगळ्या आहेत. पण, त्याचा जादुशी संबंध नाही. हिप्नॉटिझममध्ये आपले मन ठरवत असते.
 

तुम्ही जादूगार म्हणून पोलीसांना कसे सहाय्यभूत ठरलात? 
- जादुद्वारे माणसाच्या मनात येणारे विचार जाणता येतात. मग मन हळूहळू व्यक्त होते. आपल्याकडे मानवाधिकाराचा विचार करता पोलिसांना एखाद्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हेगाराला थर्ड डिग्रीचा वापर करता येत नाही. अशावेळी जादुद्वारे आरोपीच्या मनात शिरुन त्याच्या मनाचा अर्थात मानसिकतेचा ठाव घ्यावा लागतो. मुंबई, नवी मुंबई पोलिसांनी अनेक गुन्ह्यातील आरोपींकडून गुन्ह्यांच्या कबुलीसाठी माझ्या जादुची मदत घतली आहे. त्यावेळी आरोपींनी देखील अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. न्युयॉर्क येथील पोलिसांनी तर किंमती ऐवज असलेल्या बॅग चोरी प्रकरणात मला पाचारण केले होते. त्यावेळी वेगळी ट्रीक वापरुन मी आरोपीकडून गुन्हा कबूल करुन घतला होता; परंतु मनाला भिती दाखवून कुठल्याही गुन्ह्याची उकल करता येत नाही, असे आपला येथील कायदा सांगतो. त्यामुळे मी आपल्याकडील पोलिसांना फक्त मदत म्हणून क्लू देण्यासाठी जादुचा वापर करतो. 
 

आजर्पयंतच्या जादुच्या प्रयोगांबद्दल?
- मी वयाच्या ९व्या वर्षी जादुचा पहिला प्रयोग केला. आज माझे वय ६२ वषे असून जादु क्षेत्रात ५० वषे कार्यरत आहे. आपण आयुष्यात एकाच कलेसाठी ५० वषे खर्च करतो, तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो. ती मोठी उपलब्धी असते. मला आजर्पयंंत कोणत्याही शारीरिक व्याधी, राहण्याची, मानसिक अडचण, आर्थिक चणचण अशा कुठल्याच समस्या जाणवल्या नाहीत. आजवर तणावमुक्त जीवन जगलो आहे. हे सर्व शक्य जादू कलेमुळे शक्य झाले आहे. जादुचे प्रयोगावेळी काय होतय ते सर्वसामान्य नागरिकांना दिसत नाही. जादुमध्ये दृष्टीभ्रम, तांत्रिक भ्रमता, अधांतरी होणे, गोल फिरणे, स्वतःभोवती फिरणे असे वेगवेगळे प्रकार असून ते सर्वसामान्यांना डोळ्याने दिसत नाही. जेवताना लागत असलेल्या ठसक्याचा अभ्यास मी केला आहे. यामागे शास्त्र आहे. यावर प्रचंड अभ्यास आहे. मनाची जादू, शरीराची भाषा, लोकांमधील संबंध यामध्येही जादू असते. 
 

जादू कलेबाबत तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांंबद्दल थोडक्यात..
- १९९५ मध्ये मला देशातील १० विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींमध्ये माझी निवड होऊन सन्मानित करण्यात आले. १९९६ मध्ये जागतिक स्तरावर मला यंग पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने गौरव झाला. या मानाच्या पुरस्कारांनंतर मी काहीतरी चांगले केले असेल, याची जाणीव झाली. आजवर मला जादुचा वापर वेगवेगळ्या पध्दतीने करता आला. शिवाय माझ्या तालमीत तयार झालेले विद्यार्थीही विविध ठिकाणी नावाजले गेले आहेत..
 

करोना काळातील आपले काम?
- करोना काळात हजारो लोकांनी आपली जवळची माणसे गमावली. तशीच दुःखद घटना माझ्याही वाट्याला आली आहे. मार्च २०२० मध्ये देशात लॉकडाऊन लागल्यानंतर परदेशातील माझ्या मित्रांनी पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये रिसेशन लागेल, दोन वषे कोणतीच कामे मिळणार नाहीत असे सांगितले होते. करोनामुळे देशात खूप जणांना आर्थिक अडचणी जाणवू लागल्या आहेत. मला तशी कोणतीच अडचण आलेली नाही. तरीही सर्क्रिंनी आपले मन खंबीर करुन येणाऱ्या संकटावर मात करण्याची हिंमत बाळगावी.
 

तुमच्या जादुकलेचा वारसा पुढे कोण चालवणार?
- ते काम माझी मुलगी किमया देशमुख करत आहे. ती मास्टर इन मास मिडीया झाली आहे आणि जादू कलाही शिकली आहे. पण, तिला मोजकेच प्रयोग शिकविले असून ते जगात कुणालाच येत नाहीत. आपल्या मनात काय चालले आहे ते किमया दुसऱ्या जागेवर राहून सांगू शकते. या प्रकाराला टेलिसायनेसिस म्हटले जाते. जे काही घडते त्याची विश्वात नाेंद होते, असे मी सांगेन. आपलं नवे शहरने माझ्या या जादूकलेची माहिती आपल्या व्यापक वाचक-दर्शक वर्गार्पयंत नेल्याबद्दल आभार. 

Read Previous

मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेना हायकोर्टाचा दणका, भाजप नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांना मोठा दिलासा

Read Next

चतुरस्त्र कलावंत... अशोक पालवे