उच्चशिक्षणासाठी परदेशात जाणा-या विद्यार्थ्यांसाठी 16 जूनला विशेष लसीकरण सत्राचे आयोजन

 उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांची कोव्हीड लसीकरण न झाल्यामुळे अडचण होऊ नये व त्यांची शैक्षणिक संधी वाया जाऊ नये याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली 31 मे व 3 जून रोजी दोन वेळा विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली होती. याचा लाभ परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या 319 विद्यार्थ्यांनी घेतला होता.

तरीही काही विद्यार्थ्यांकडून आणखी एकवार लसीकरण सत्र आयोजन करावे अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार दिनांक 16 जून 2021 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत सेक्टर 15 नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांकरीता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी परदेशी जायचे आहे अशा 18 ते 44 वयोगटातील विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी येताना सोबत आवश्यक वैध पुरावे म्हणजेच परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचे निश्चिती पत्र, परदेशी व्हिसा आणि सदर व्हिसा मिळण्यासाठी संबंधीत विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS -160 फॉर्म इ. कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे.

तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उच्चशिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणा-या वय वर्ष 18 ते 44 वयोगटातील विद्यार्थ्यांनी या विशेष लसीकरण सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Read Previous

मराठा आराक्षण रद्द केल्याने मराठा समाज आक्रमक

Read Next

धोकादायक इमारतीत स्वत:च्या जबाबदारीवर राहण्यास रहीवाशी तयार!