भूमीगत कचरापेंटींना पाणी साचण्याच्या समस्येने ग्रासले

नवी मुंबई -: नवी मुंबई शहराला कचरा कुंडी मुक्त तसेच कचरा मुक्त रस्ते करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मागील वर्षी करावे गाव येथे  प्रायोगिक तत्वावर  दोन ठिकाणी भूमीगत कचरा कुंडी उभारण्यात आलेल्या आहेत. मात्र या भूमीगत कचरा पेटीमध्ये आता पावसाचे पाणी साचत असल्याने अडचणी येत आहेत . त्यामुळे शहरात आणखीन  भूमीगत कचरा कुंडी सुरू करण्याबाबत प्रशासनापुढे पेच निर्माण झाला असून यावर तोडगा काढण्याबाबत मनपा प्रशासन.विचाराधीन आहे.

  'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत ' नवी मुंबईला शून्य कचरा निर्मिती तसेच कचरामुक्त रस्ता करण्याच्या दृष्टीने  कचऱ्याच्या वर्गीकरणावर भर दिला असून  घंटा गाडीने कचरा वाहून नेला जात आहे. तर रस्ता  कचरा मुक्त रहावा म्हणून शहरातील सर्व उघड्या कचरपेट्या हटविण्यात आलेल्या आहेत.  मात्र आज ही काही तुरळक ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकलेला निदर्शनास येत आहे. 

शहरातील नागरिकांना कचरा वर्गीकरण आणि रस्त्यावर कचरा न टाकण्याची सवय लागावी म्हणून मनपा द्वारे विविध उपक्रम, प्रयोग राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने सन २०२१ मध्ये नवी मुंबई महापालिकेने एल अँड टी यांच्या सी एस आर फंडातून करावे गाव येथे प्रायोगिक तत्त्वावर दोन भूमीगत कचरा कुंड्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मात्र याठिकाणी पावसाळ्यात पावसाचे पाणी शिरून तांत्रिक समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या येणाऱ्या  या अडचणीवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध पर्याय शोधण्यासाठी चाचपणी सुरू असल्याची माहिती घनकचरा विभागाकडून देण्यात आली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लोकशाही दिनाकरीता अर्ज नमुना वेबसाईड वरुन डाऊनलोड करुन घेण्याचे आवाहन