खारघर : खारघर येथील मराठी ब्राह्मण समाज या सामाजिक संस्थेचा जागर मंगळागौरीचा हा पारंपारिक मंगळागौरीच्या खेळांचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात 6 वर्षांच्या चिमुरडी पासून 72 वर्षांच्या आजी. अशा तीन पिढ्या सहभागी झाल्या होत्या. या वेळी खारघर फोरमच्या अध्यक्ष लीना गरड , अक्षर ज्योती फाऊंडेशनच्या संस्थापिका ज्योती सरवदे आणि भाजपच्या रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा संध्या शरबिद्रे उपस्थित होत्या. या कार्यक्रमात विश्व मांगल्य सभा खारघर, स्वरतरंग, स्वरांजली, तेजस्विनी महिला मंडळ आणि मी मराठी माझी मराठी आदी संस्थेच्या महिला सदस्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी मराठी ब्राह्मण समाजाच्या अध्यक्ष ऍड. सौ गिरीजा भट यानी मराठी ब्राह्मण समाज संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी महिलांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली लाभे यांनी तर प्राजक्ता दिवेकर यांनी आभार मानले.